Goa News : तांबडीसुर्ल मंदिर परिसरातील गाडे हटवा ; ‘ पुरातत्त्व ’ चे पत्र

पंचायत आक्रमक : कचरा आढळल्यास २ हजारांचा दंड
Parking Issue
Parking IssueGomantak Digital Team
Published on
Updated on

तांबडीसुर्ल : तांबडीसुर्ल साकोर्डा येथील श्री महादेव मंदिर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. पार्किंगसाठी आरक्षित जागेत गाडे अथवा दुकाने थाटल्याने येथे भेट देण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. शिवाय कचरा पसरून परिसर गलिच्छ होत आहे.

त्यामुळे येथील मंदिर कुंपणाच्या ३०० मीटर परिघातील सर्व गाडे अथवा दुकाने त्वरित हटवावीत, असे पत्र भारतीय पुरातत्व खात्याच्या फोंडा कार्यालयातून साकोर्डा पंचायतीला पाठवण्यात आले आहे.साकोर्डा पंचायतीने या पत्राची गंभीर दखल घेतली असून सदर विषय पंचायतीच्या पाक्षिक बैठकीत चर्चेत आला. गाडे अथवा दुकानांविरुध्द तसेच तेथे होणाऱ्या कचरा प्रदूषणाविरोधात पंचायतीने कडक धोरण अवलंबले आहे.

Parking Issue
Ram Navami Special Recipes: रामनवमीला झटपट बनवा 'हे' खास पदार्थ!

कचरा आढळल्यास दोन हजार दंड

सरपंच प्रिया खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली तांबडीसुर्ल येथे गाडेधारकांची विषेश बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाडेधारकांना अटी व शर्थींबाबत माहिती देण्यात आली. स्थानिक पंच संजना नार्वेकर , सचिव भूषण तावडे व गाडेधारक उपस्थित होते. गाडेधारकांच्या परिसरात कचरा आढळल्यास प्रत्येक विक्रेत्याला २ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. विक्रेत्याने दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास तेथील सर्व गाडे हटविण्यात येतील,असाही ठराव घेण्यात आला.

Parking Issue
Goa Government on Unemployment: गोव्यातील तरुणांमध्ये उद्योग कौशल्याची कमतरता; मुख्यमंत्र्यांनी केल्या 'या' तरतूदी

फुले विक्रेत्यांत वादावादी

तांबडीसुर्ल येथील फुले विक्रते हे स्थानिक रहिवासी असूनही देखील त्यांच्यात कधीकधी फिरून भाविकांना तथा पर्यटकांना फुलांची विक्री करत असताना फुले विक्रेत्यांत शाब्दिक बाचाबाची, वादावादी होत असल्याचे बैठकीत उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com