Goa Ganesh Chaturthi 2023: बेतकी-खांडोळात ‘एक गाव,एक कुटुंब, एक गणपती’

Goa Ganesh Chaturthi 2023: तळेकर कुटुंबीयांची परंपरा: दरवर्षी चतुर्थीत ३५०हून अधिक सदस्य एकत्र
Goa Ganesh Chaturthi 2023:
Goa Ganesh Chaturthi 2023: Dainik Gomantak

एकनाथ खेडेकर

Goa Ganesh Chaturthi 2023: तळेवाडा, बेतकी-खांडोळा येथील तळेकर कुटुंबातील सुमारे ३५० हून अधिक लोक ‘एक गाव, एक कुटुंब व एक गणपती’चा उत्सव एकत्रित येऊन दरवर्षी परंपरेनुसार साजरा करतात. कामानिमित्त विविध ठिकाणी विखुरले असले तरी पूर्वजांपासून सुरू असलेली परंपरा टिकवून ठेवण्याचा मनोदय कुटुंबातील प्रत्येकजण व्यक्त करतो. तळेकर कुटुंबीयांचा एकत्रित येऊन दरवर्षी 5 दिवशीय गणेश चतुर्थी साजरी करीत असून कुटुंबातील प्रत्येक सदस्य हातभार लावून परंपरा पुढे नेत आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023:
Comunidade: मुजोर अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

बेतकी-खांडोळा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या तळेवाडा या गावात तळेकर कुटुंबांची सुमारे २० घरे आहेत. त्याशिवाय कामानिमित्त खांडोळा, म्हापसा, सावर्डे, पाळी, तिवरे, माशेल व अन्य भागात कित्येकजण वास्तव्य करीत आहेत. विविध ठिकाणी विखुरले असले तरी तळेकर कुटुंबीय तळेवाडा येथील जुन्या घरात येऊन ५ दिवसीय गणेश चतुर्थी साजरी करतात. गणेश चतुर्थी साजरी कारण्यासाठी सर्वजण निधी गोळा करून उत्सवासाठी खर्च करतात. युवक घराला रंगकाम, पताका लावून सजावट करणे, आरत्या व अन्य वस्तू खरेदीसाठीचे कार्य करतात.

नवी घरे बांधली; पण जुन्या घरीच चतुर्थी !

गजानंद तळेकर या 71 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार आपल्या बालपणीपासून एकत्रितपणे गणेशाचे पूजन करण्यात येत आहे. अधिक तर कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त गावाबाहेर घरे बांधून राहत आहेत. परंतु कुणीच आपल्या नवीन घरात गणेशाचे पूजन करीत नाही. सर्वजण चतुर्थीच्या उत्साहाने एकत्रित येऊन उत्सव साजरा करीत असल्याने पूर्वजांची परंपरा अजूनही सुरू असल्याचे सांगितले.गोव्यातील लोकांना संदेश देताना ते म्हणाले की,आपसातील मतभेद अनेक कुटुंबात असतात. चतुर्थीचा उत्सव मोठा सण असल्याने मतभेद विसरून सर्वांनी गणेश चतुर्थीचा उत्सव एकत्रितपणे साजरा करावा, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com