Panaji News : २४ अर्ज नेले, पहिल्या दिवशी एकही दाखल नाही; २८ रोजी निवडणूक

Panaji News : येत्या २८ एप्रिल रोजी पंचायतीचे मतदान होणार आहे. मागील पाच वर्षांत ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटची स्थापना झालेली आहे.
goa
goaDainik Gomantak

Panaji News :

पणजी, ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी आजपर्यंत इच्छुक उमेदवारांनी २४ अर्ज नेले, पण अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.

येत्या २८ एप्रिल रोजी पंचायतीचे मतदान होणार आहे. मागील पाच वर्षांत ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटची स्थापना झालेली आहे.

११ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी आमदार गटाने आपले अकराही उमेदवार जाहीर केले आहेत. ताळगाव पंचायतीवर व विधानसभा मतदारसंघावर आमदार बाबूश मोन्सेरात यांचा दबदबा राहिला आहे. सध्या पंचायतीचे राजकारण आणि कारभारावर आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे लक्ष आहे.

goa
Goa Congress: काँग्रेसच्या गोव्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार? दिल्लीत खलबते

पंचायतीत एकहाती सत्ता येत असली तरी एखाद-दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला तरी पंचायतीची निवडणूक ही होतच आली आहे. अपक्ष म्हणून एका-एका वॉर्डमध्ये तीन-चार उमेदवार उभे राहत असल्याचे चित्र असले तरी आमदार गटाच्या उमेदवाराला ५० टक्क्यांवर मतदान होत आले आहे.

गतवेळी ३ क्रमांकाच्या प्रभागातून आग्नेल डिकुन्हा बिनविरोध निवडून आले होते. त्यावेळी १० जागांसाठी मतदान रिंगणात २८ उमेदवार होते आणि १६ हजार २०९ मतदारांपैकी ११ हजार ४९२ म्हणजेच ७०.९० टक्के मतदारांनी मतदान केले होते.

शाई कुठे लावणार?

ताळगाव पंचायत क्षेत्रात १९ हजार ३४९ मतदार आहेत. त्या मतदारांना पंचायतीसाठी आणि लोकसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. पंचायतीसाठी २८ एप्रिलला मतदान झाल्यानंतर ७ मे रोजी लोकसभेसाठी मतदान करावे लागणार आहे.

त्यामुळे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई दहा दिवसांत ते पंधरा दिवस राहते. डाव्या हाताच्या तर्जनीवर म्हणजेच अंगठ्याशेजारील बोटावर ती शाई लावलेली असते. त्यामुळे लोकसभेला मतदान करताना या मतदारांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यावर आता राज्य निवडणूक आयोग काय तोडगा काढतोय, हे पहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com