Taleigao Panchayat Election : ताळगाव पंचायत निवडणुकीला वादाची किनार; सात जागांसाठी ६८.७९ टक्के मतदान

Taleigao Panchayat Election : कामराभाट येथील सरकारी शाळेत मतदान केंद्र आहे. पंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रापासून बूथ उभारणीसाठी १०० मीटर अंतराची रेषा आखली गेली होती.
Taleigao Panchayat Election
Taleigao Panchayat Election Dainik Gomantak

Taleigao Panchayat Election :

पणजी, ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीसाठी आज सात जागांसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत दिवसभरात ६८.७९ टक्के मतदान झाले. गतवर्षी ७०.९० टक्के मतदान झाले होते, यावर्षी २.२१ टक्क्यांनी मतांचा टक्का घसरल्याचे दिसून आले.

बाबूश मतदान केंद्राजवळ पोहोचल्याने सिसील व त्यांच्या गटाच्या लोकांमध्ये शाब्दिक वाद झाले, परंतु त्यानंतर बाबूश यांनी त्या वादाला हवा न देता हस्तांदोलन करीत वादावर पडदा टाकला. मतदार मतदानासाठी बाहेर पडलेला दिसून आला, परंतु दुपारनंतर मात्र तसा उत्साह मतदारांमध्ये दिसला नाही. ज्येष्ठ, नवमतदारही मतदान केंद्रांवर रांगेत उभे होते.

अकरा सदस्य संख्या असलेल्या या पंचायतीच्या चार सदस्य हे मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट''चे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सात जागांवर निवडणूक लागली आहे. ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटला सर्वपक्षीय ‘युनायटेड ताळगावकर'' या आघाडीचे आव्हान मिळाले आहे. युनायटेड ताळगावकरने दहा जागांवर उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले होते. परंतु त्यातील तिघांनी माघार घेतल्याने आमदार गटाचे तीन उमदेवार बिनविरोध निवडून आले.

Taleigao Panchayat Election
PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल

वादाची ठिणगी; पण...

कामराभाट येथील सरकारी शाळेत मतदान केंद्र आहे. पंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रापासून बूथ उभारणीसाठी १०० मीटर अंतराची रेषा आखली गेली होती. परंतु त्याचवेळी लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी २०० मीटरची रेषाही आखली गेली आहे.

काल (शनिवारी) युनायटेड ताळगावकरच्या सिसील रॉड्रिग्स व इतर कार्यकर्ते बूथ उभारणीसाठी आले असताना अधिकाऱ्यांना २०० मीटरच्या बाहेर बूथ उभारणीस सांगितले. सकाळी मात्र आमदार गटाच्या कार्यकर्त्यांनी १०० मीटरच्या बाहेर बूथ घातल्याने त्याला सिसील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.

याविषयी सिसील यांनी माध्यमांना सांगितले की, या बुथवरून जी मतदारांना स्लिप दिली जात होती, त्यावर नाव आणि उमेदवाराला मिळालेल्या चिन्हाचे चित्र होते, अशा स्लिप देता येत नाहीत. तरीही त्या स्लिप दिल्या जात होत्या, त्यालाच आमचा आक्षेप आहे.

आमदार बाबूश याठिकाणी पोहोचल्याने सिसील व त्यांच्या गटाच्या लोकांमध्ये शाब्दिक वाद झाले; परंतु त्यानंतर बाबूश यांनी वादाला फोडणी न देता हस्तांदोलन करीत वादावर पडदा टाकला. लोक जमा झाल्याची बातमी समाजमाध्यमातून व्हायरल होता, केंद्रीय राखीव पोलिस दलाची तुकडी याठिकाणी पाठवण्यात आली.

आज मतमोजणी होणार! :

ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीच्या आजच्या मतमोजणीकडे सर्व राज्याची नजर असणार आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय ‘युनायटेड ताळगावकर्स''ने मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या `ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट'' पुढे आव्हान निर्माण केले होते.

अकरा सदस्यांपैकी आमदार गटाचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले तरी उर्वरित सातही जागांवर हा गट बाजी मारणार काय की विरोधी गट धक्का देतो, हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मतमोजणी कांपाल येथील बालभवन येथे सोमवार २९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सज्जता ठेवली आहे. मतदान झाल्यानंतर सायंकाळी मतपेट्या पोलिस बंदोबस्तात मतमोजणी केंद्रामध्ये आणण्यात आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com