Taleigao: व्हडलेभाट येथील अतिक्रमणांवर हातोडा! ताळगाव पंचायतीची कारवाई; 5 बांधकामे रडारवर

Taleigao Demolition: दोन महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील बेकायदा बांधकाम तसेच अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
Taleigao encroachment removal
Taleigao encroachment removal Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: व्हडलेभाट, ताळगाव येथे घरासमोर बेकायदा केलेले बांधकाम तसेच उभारलेली पत्राची शेड सोमवारी पोलिस संरक्षणात बेकायदा बांधकाम हटाव पथकाच्या मदतीने पाडण्यात आली. ताळगाव पंचायतीने या बांधकाम मालकाला बेकायदा बांधकाम हटविण्याची नोटीस बजावली होती, मात्र मुदत देऊनही न हटविल्याने सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली.

पंचायतीने आणखी ताळगावात ५ बेकायदेशीर बांधकामांना नोटिसा बजावल्या असून त्यांचीही बांधकामे मुदत संपल्यानंतर पाडण्यात येतील अशी माहिती ताळगाव पंचायत सचिव गौरेश पेडणेकर यांनी दिली.

दोन महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील बेकायदा बांधकाम तसेच अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

सरकारी, कोमुनिदाद व शेतजमिनीत केलेली बांधकामे हटविण्याचे निर्देश पंचायत व पालिकांना दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक पंचायत त्याचा सर्वे करून बेकायदा बांधकाम मालकांना नोटिसा पाठवून हे हटवण्यासाठी मुदत देत आहे. सांतिनेझ ते सांपॉल या बायपास रस्त्याच्या बाजूने सेंट मायकल स्कूलच्या जवळ असलेल्‍या घराबाहेर शेड काढण्यात आली होती.

Taleigao encroachment removal
Curti Khandepar: पंचायतीनेच हटवले माजी सरपंचांचे बांधकाम! कुर्टी - खांडेपारमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

तसेच बेकायदेशीर बांधकाम करून फास्ट फूड सुरू करण्यात आले होते. हे बांधकाम पॅट्रिक सायमन रॉड्रिग्ज यांच्या मालकीचे असून रस्त्याच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत ते होते. ताळगाव पंचायतीने नियमानुसार मालकाला नोटीस बजावली होती, तिला आव्हान दिले होते. मात्र त्याला स्थगिती मिळाली नव्हती.

Taleigao encroachment removal
Illegal Fishing Boats: बेकायदा LED, बुल ट्रॉलिंग बोटींची नोंदणी रद्द करा! खंडपीठाचे निर्देश; गस्ती बोट कार्यरत नसल्याची टिपणी

इतरांचे धाबे दणाणले

बांधकाम न पाडण्यासाठी स्थगिती मिळवली आहे असा दावा मालक करत होता, मात्र तो आदेश सादर करू शकले नाहीत. या घराची वीजप्रवाह बंद करण्यात आला. सुमारे अर्धा तासानंतर बेकायदा बांधकाम स्टॉल पाडण्यास सुरवात झाली. या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्या इतरांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com