Taleigao: कुठून येते दूषित पाणी? ताळगावातील प्रश्न सुटेना; व्हडलेभाटवासीय त्रस्त

Taleigao water issue: सहाय्यक अभियंत्यांनी व्हडले भाट परिसरातील नाल्यांमध्ये उघड्यावर सोडलेले सांडपाणी सरपंचांना बोलावून दाखविले. ही समस्या जवळजवळ एक महिन्यापासून सुरू आहे.
Taleigao water issue
Goa water issueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ताळगावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. गेल्या आठवड्यापासून ही समस्या सुटलेली नाही. अनेक ठिकाणी खोदकाम करूनही जलवाहिनीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा मुख्य स्रोत सापडलेला नाही. या समस्येविषयी सामाजिक कार्यकर्त्या सीसिल रॉड्रिग्स यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, या दूषित पाण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्याशी संपर्क साधला आहे. अनेक संकुलांमध्ये सांडपाणी उघड्यावर सोडल्याचे दिसून आले. परंतु अद्याप मुख्य स्रोत मिळालेला नाही.

Water
WaterDainik Gomantak

याशिवाय सहाय्यक अभियंत्यांनी व्हडले भाट परिसरातील नाल्यांमध्ये उघड्यावर सोडलेले सांडपाणी सरपंचांना बोलावून दाखविले. ही समस्या जवळजवळ एक महिन्यापासून सुरू आहे. दूषित पाण्यामुळे व्हडेलभाट व बरभाट परिसरातील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.

Taleigao water issue
Free Water Scheme: ऐन उन्हाळ्यात गोमंतकीयांना धक्का! सरकारकडून 'मोफत पाणी' योजना बंद, घरगुती ग्राहकांना मोठा फटका

दोन्ही वॉर्डच्या संपूर्ण भागात समस्या शोधण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदले गेले आहेत, तरीही मुख्य स्रोत मिळाला नाही. सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे, ज्यामुळे रहिवाशांना आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

Taleigao water issue
Goa Water Crisis: गोव्यातील बहुतांश धरणातील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, पण सरकार म्हणतंय, 'पिण्याच्या पाण्याची चिंता नको'

या समस्येचे निराकरण करण्यात आणि योग्य सांडपाणी जोडण्या न देता एनओसी देण्यात पंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे ही समस्या उद्‍भवली आहे. डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार उद्‍भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामसभेत वारंवार तक्रारी करूनही, पंचायतीने समस्या सोडवण्याची कारवाई केलेली नाही.

संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येवर त्वरित उपाय शोधावेत, अशी आमची विनंती आहे. सहाय्यक अभियंत्यांनी त्वरित येथील नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू केल्याने या परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तात्पुरती समस्या सुटली आहे.

सिसिल रॉड्रिग्स, सामाजिक कार्यकर्त्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com