त्वरित कारवाई करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, केपेतील नागरिक संतप्त

अशाच प्रकारे दहा वर्षापूर्वी 2012 साली बारसे येथे दगड फोडणा-या खाणीवर हादसा घडल्यामुळे तिघांना आपले प्राण गमवावे लागले होते.
Cuncolim Assembly Election
Cuncolim Assembly Election Dainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी : केपे तालुक्यातील बारशे पंचायत क्षेत्रातील सुबदळे येथील कोरडे भागात डोंगर पोखरून बेकायदेशीर दगड फोडण्याचे काम चालत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मोठ्या प्रमाणात जिलेटीनचा स्फोट घडवून व मोठ्या यंत्राच्या सहायाने दगड फोडण्यात येत असल्यामुळे या भागातील घरांना धोका समभावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जिलेटीन स्फोटामुळे मातीच्या घरांच्या भिंतीना भेगा पडल्या असून दगडाच्या भूकंडी मुळे येथील काजू बागायतीवर विवरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे (citizens) म्हणणे आहे. डोंगर खननामुळे येथील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतावर परिणाम झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Cuncolim Assembly Election
मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघातून फेटाळले 18 अर्ज

या संदर्भात स्थानिकांनी खाण संचालक, उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, स्थानिक पंचायत व इतर संबंधित खात्याकडे तेखी तक्रार नोंदवली असून स्थानकानी या संदर्भात सह्याचे निवेदन संबंधित अधिका-यांना दिल्यास दोन महिने उलटायला आले तरी या संदर्भात कोणतीही कारवाई न (Action) केल्यामुळे स्थानिक संतप्त झाले आहेत. या डोंगरा वरून काढलेल्या दगडांचा वापर खडी करण्यात होत असून मोठ्या प्रमाणात अवझड वाहनातुन वाहतूक (Transport) होत असल्यामुळे या गावाला जोडणारा लहान पूल कमकुवत बनला आहे.

अशाच प्रकारे दहा वर्षापूर्वी 2012 साली बारसे येथे दगड फोडणा-या खाणीवर हादसा घडल्यामुळे तिघांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Cuncolim Assembly Election
कळंगुटमध्ये ड्रग्जसह 12 लाखांचा मुद्देमालजप्त, महिलेला अटक

सुबदळे हा निसर्ग संपन्न गांव असून या गावातील लोक नैसर्गिक जल स्रोतावर निर्भर असून गावात चालणाऱ्या बेकायदेशीर दगड खनना मुळे स्थानिकांचे जगणे मुश्किल बनल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्ष भरा पासून स्थानिक या बेकायदेशीर उद्योगावर आवाज उठवीत आहेत स्थानिक पंचायतीचे पंच सदस्य व लोकप्रतिनिधी या प्रकरणात कारवाई करण्यात कचरतात असा स्थानिकांचा आरोप आहे.

या प्रकरणी आवाज उठवल्यामुळे काही स्थानिक पुढारी ज्यांना या बेकायदेशीर कृत्यातून आर्थिक प्राप्ती होते ते युवकांना धमकी देत असल्याचा आरोप स्थानिक युवक करतात.या बेकायदेशीर कृत्यास राजकीय वरदहस्त लाभल्याने व सरकारी (Government) यंत्रणेचा छुपा आशीर्वाद असल्यामुळे या बेकायदेशीर कृत्यावर कारवाई होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

स्थानिकांनी लेखी तक्रार देऊनही अशा बेकायदेधीर कृत्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने लोक संतप्त झाले आहेत. या बेकायदेधीर कृत्यावर त्वरित कारवाई न झाल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर (Assembly Election) बहिष्कार घालण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com