'गोव्यात जातीय तेढ वाढवणाऱ्यांवर कारवाई करा'

‘पीएफआय’ची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Popular Front Of India, Goa
Popular Front Of India, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: रामनवमीच्या दिवशी इस्लामपूर, वास्कोत रामनवमी मिरवणुकीवर जी दगडफेक झाली व त्यामुळे जी गंभीर परिस्थिती उदभवली त्याची दखल घेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया गोवा शाखेने आज दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन सादर करून जातीय तेढ भडकावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.गोव्यामध्ये जे फॅसिस्ट हिंदुत्ववादी गट आहेत, ते सध्या अशा घटनांचा फायदा घेत जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

राम नवमीच्या मिरवणुकीतील काही फॅसिस्ट हिंदुत्ववादी गटातील व्यक्तींनी दाभोली येथील मस्जिद ई नूर येथे जमाव केला व मुस्लिमांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. नंतर ते इस्लामपुर येथील मशिदीकडे जाऊन आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अल्पवयीन अपंग मुलाला त्यांनी धक्काबुक्की केली. तो मुलगा रडू लागला व मदतीसाठी आरडाओरड करू लागला, असेही या निवेदनात म्हटले आहे.

Popular Front Of India, Goa
लोलये भागातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचा पुरावा नसल्याचेही पीएफआयच्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात त्यांनी जयेश नाईक व राजीव झा यांचाही उल्लेख केलेला आहे. या मध्ये राज्याबाहेरील लोकांचा हात असल्याचेही म्हटले आहे. या निवेदनावर पीएफआयच्या गोवा शाखेचे अध्यक्ष शेख अब्दुल रॉफ यांनी सही केली आहे.

नंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष अब्दुल रॉफ यांनी सांगितले की, गोव्यात धर्माच्या नावार जातीय दंगली यापूर्वी कधीच झालेल्या नाहीत. गोवा हे शांतताप्रिय राज्य आहे. राज्यात सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. रामनवमी, शिमगो हे गोवेकरांचे पारंपरिक उत्सव आहेत. या प्रकरणात जे आहेत ते इतर राज्यांतील असून त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. ही संपूर्ण घटना पूर्व नियोजित व राजकीय दृष्ट्या प्रेरीत असल्याचेही रॉफ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Rainfall Deficit 2026
Goa Ganesh Chaturthi Celebration 2026
Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com