Goa: जलतरण प्रकल्प, चौपदरी बंदर जोडणी प्रकल्प पूर्णत्वाकडे

Goa: मुरगाव मतदार संघातील जलतरण प्रकल्पाचे आणि चौपदरी बंदरजोडणी प्रकल्पाचे काम लवकरच पूर्णत्वास येईल असे मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले
Goa-Vasco : Four-lane port connection project
Goa-Vasco : Four-lane port connection projectGoa: Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: Goa मुरगाव मतदार संघातील (Murgaon constituency) जलतरण प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल तसेच चौपदरी बंदरजोडणी प्रकल्पाचे १९ डिसेंबर २०२१ रोजी उद्घाटन करावयाचे आहे. तेही काम लवकरच पूर्णत्वास येईल असे मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले. हेडलँड सडा बोगदा येथील त्यांच्या शासकीय बंगल्यावर लाडलीलक्ष्मी नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्याबरोबर दिल्लीत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highways Minister Nitin Gadkari) यांची भेट घेऊन येथील प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. यात मुख्यत्वे चौपदरी बंदर जोडणी प्रकल्पासंबंधी असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

Goa-Vasco : Four-lane port connection project
गोव्यात खाजगी वनक्षेत्र जमीनीत 'घोटाळा'; विजय सरदेसाईंचे गंभीर आरोप

चौपदरी बंदर जोडणी प्रकल्पाचे बांधकाम ‘गॅमन इंडिया’ करीत असून ‘गॅमन इंडिया’ला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून १८ कोटी देय आहे. ९० टक्के काम पूर्ण झाले असून त्यांचे देय देण्याचे गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चेअरमनशी बातचीत करून निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले. ‘गॅमन इंडिया’ला काही देय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावयाची असल्यानेच या कामाला विलंब झाला असल्याचे नाईक म्हणाले. या प्राधिकरणाच्या नव्या अध्यक्षांनी सर्व देय या त्वरित देण्यात यावीत असे श्री गडकरी यांनी सुचवले असल्याचे त्यांनी परत एकदा सांगितले. नंतर हे काम त्वरित हाती घेऊन पूर्णत्वास आणले जाईल असे ते म्हणाले. ‘गॅमन इंडिया’नेही हा प्रकल्प उद्घाटनापूर्वी १५ दिवस अगोदर हाती देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे असे मंत्री नाईक यांनी सांगितले. तसेच ‘सडा जंक्शन’ जवळील कामासंदर्भातही चर्चा झाली असून या दोन्ही प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ‘हॉट मिक्सिंग’चे काम पावसाळ्यानंतर होणार कारण, पावसाळ्यात हॉट मिक्सिंग करण्यात येत नसल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com