मार्लीवासीयांना 'गोवा मुक्ती'च्या 60व्या वर्षी रस्त्याची भेट

उपसभापती इजिदोर फर्नांडीस (Deputy Speaker Isidore Fernandes) यांच्या प्रयत्नामुळे मार्लीवासीयांना मिळाली रस्त्याची भेट
Marlem Road
Marlem RoadDainik Gomantak
Published on
Updated on

मार्लीवासीयांना (Marlem Village) 'गोवा मुक्ती'च्या 60 व्या वर्षी (60th Goa Liberation) रस्त्याची भेट मिळणार आहे, ही भेट उपसभापती इजिदोर फर्नांडीस (Deputy Speaker Isidore Fernandes) यांच्या प्रयत्नामुळे मार्लीवासीयांना मिळाली असल्याचे या वाड्याचे पंच व पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर यांनी सांगितले. यापूर्वी फर्नांडीस अपक्ष आमदार असताना व दिगंबर कामत वीज मंत्री असताना या वाड्याला वीज पुरवठा करून येथील घरातून वीजेचा प्रकाश पडला होता, असे या वाड्याचे माजी पंच कुष्ठा गावकर यांनी सांगितले.

रस्त्याच्या मागणीसाठी येथील रहिवाश्यांनी गेल्या लोकसभा निवडणूकीवर जाहीर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, काणकोणचे मामलेदार यांनी मार्ली वाड्याला भेट देऊन रस्त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सोपस्कार पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. हा रस्ता खोतीगाव अभयारण्य कक्षेत येत असल्याने रस्त्याच्या बांधणीस वनखात्याची आडकाठी होती, मात्र आता काही अटींवर वनखात्याने रस्ता काढण्यास व रस्त्याचे डांबरीकरण करण्यास मान्यता दिली आहे. वन खात्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंटचे खांबे उभारून संरक्षक कुंपण उभारण्याची तयारी केली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या रस्त्याच्या बांधणीचा शुभारंभ करण्यात आला, मात्र सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्याची बांधणी रेंगाळली आहे, मात्र गेल्या आठवड्यापासून रस्त्यावर दगड रचण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील रहिवाश्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भाग्य लाभत आहे, त्यातच आपल्याला आनंद असल्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी सांगितले.

Marlem Road
'स्वच्छ भारत अभियाना'निमित्त 'वास्कोत' स्वच्छता मोहिम

रस्त्या अभावी येथील मुले चौथी नंतर वसतीगृह व नातेवाईकांकडे राहून पुढचे शिक्षण घेतात. कदंब बस किंवा शाळा बस तिर्वाळ पर्यत ये जा करतात. मात्र त्यानंतर येथील विद्यार्थ्याना सुमारे तीन किलोमीटरचे अंतर पायी चालत जावे लागते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना जंगली श्वापदांना सामोरे जावे लागते. या रस्त्यावर दोन तीव्र वळणे व चढाव आहेत ती वळणे व चढाव कापून रस्ता तयार करावा अशी येथील रहिवाश्याची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com