Surla Ecotourism Campsite: पर्यटकांसाठी खुशखबर! तंबूत राहा, सुर्लातील निसर्गचा आनंद घ्या, वनखात्याचा Special Project

Surla Ecotourism Campsite opening for tourists in Goa: वन विकास महामंडळाच्या पुढाकाराने सत्तरीतील सुर्ला भागात निसर्गस्नेही इकोटुरिझम कॅम्पसाईट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सत्तरीचा पर्यटनदृष्ट्या विकास होईल आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Ecotourism campsite project At Surla
Ecotourism campsite project At SurlaCanva
Published on
Updated on

Ecotourism campsite project At Surla

वाळपई: वन विकास महामंडळाच्या पुढाकाराने सत्तरीतील सुर्ला भागात निसर्गस्नेही इकोटुरिझम कॅम्पसाईट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सत्तरीचा पर्यटनदृष्ट्या विकास होईल आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

घाट माथ्यावरील सुर्ला परिसरातील जंगलाची जैवविविधता, घनदाट वनराई आणि शांततामय निसर्ग हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहेत. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे पर्यटकांना जंगलाचे सौंदर्य अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार असून गोव्याच्या नैसर्गिक वारशाचे जतन होणार आहे.

महत्त्वपूर्ण टप्पा

सुर्ला इकोटुरिझम कॅम्पसाईट हा गोवा सरकारच्या शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनाचा भाग असून हा प्रकल्प निसर्ग पर्यटनाचा आदर्श ठरेल. हा उपक्रम सत्तरीच्या विकासाला नवी दिशा देणारा असून पर्यटकांसाठी निसर्गसंपन्न अनुभव देत गोव्याच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावेल, असे आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

निसर्ग पर्यटनाला गती

या प्रकल्पामुळे सत्तरी तालुक्यात निसर्ग पर्यटनाला गती मिळणार आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्याचबरोबर पारंपरिक ज्ञान आणि संस्कृती जतन करण्यास मदत होईल.

Ecotourism campsite project At Surla
Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

इको-फ्रेंडली निवास व्यवस्था : कॅम्पसाईटमध्ये पर्यावरणपूरक साहित्याने तयार करण्यात येणाऱ्या केबिन्स आणि तंबू पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देतील.

निसर्ग ट्रेल्स आणि ट्रेकिंग : पर्यटकांसाठी निसर्ग मार्ग तयार करण्यात येणार असून त्याद्वारे जंगलातील विविध वनस्पती आणि प्राणिजगताचे मार्गदर्शित अन्वेषण करता येईल.

पक्षी निरीक्षण : पक्षी प्रेमींसाठी खास पक्षी निरीक्षण स्थळे व मार्गदर्शित पक्षी निरीक्षण सहलींचे आयोजन केले जाईल.

स्थानिक समुदायाचा सहभाग : स्थानिक लोकांना सांस्कृतिक कार्यशाळांमध्ये सहभागी करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील.

संवर्धन शिक्षण केंद्र : वनसंवर्धनाचे महत्त्व आणि शाश्वत पर्यटन पद्धतीविषयी जनजागृती करणारे केंद्र विकसित केले जाईल.

सुर्ला परिसरातील इकोटुरिझम कॅम्पसाईट हा माझ्या हृदयाजवळचा प्रकल्प आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही पर्यावरणाचे जतन करताना लोकांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित नाही, त्यापलीकडेही अनेक सुंदर स्थळे आहेत, ज्यांचा शोध घेण्याची ही संधी आहे.

डॉ. दिव्या राणे, आमदार, पर्ये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com