Surge in covid-19 cases in BITS Pilani goa
Surge in covid-19 cases in BITS Pilani goaDainik Gomantak

गोव्यातील BITS Pilani कॅम्पसमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ

कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे.
Published on

पणजी: झुआरीनगर येथील बीआयटीएस पिलानी (BITS Pilani) कॅम्पसमध्ये 24 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये 16 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे. यामध्ये बहुतेक विद्यार्थी आहेत, तर उर्वरीत स्टाफ मेंबर आहेत. (Surge in covid-19 cases in BITS Pilani goa)

Surge in covid-19 cases in BITS Pilani goa
गोव्यात 2013 नंतर यंदाचा मार्च सर्वात उष्ण

याबाबत बोलताना राज्य महामारी तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेटोडकर यांनी माहिती दिली की, खाजगी संस्थेत 25 मार्च रोजी कोविड-19 चा पहिला रुग्ण आढळून आला होता. रुग्णांना सौम्य किंवा कोणतीही लक्षणे नाहीत. पहिल्या 24 बाधितांपैकी 4 विद्यार्थी (Students) बरे झाले आहेत.

“शुक्रवार आणि शनिवारी रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी कुणीही गंभीर आजारी नाही. सर्व विद्यार्थ्यांना विलगीकरणात आहेत, ” असे अर्जुन हरलंकर, BITS पिलानी गोवा (Goa) कॅम्पसचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले.

Surge in covid-19 cases in BITS Pilani goa
नार्वेतील सप्तकोटेश्वराला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांकडून अभिषेक

“कोरोना रुग्ण आढळल्यानंतर ऑफलाइन वर्ग बंद करून ऑनलाइन अभ्यास सुरू करण्यात आला आहे,” ते पुढे म्हणाले. कोविड (COVID-19) प्रकरणांचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबद्दल विचारले असता, हरलंकर म्हणाले, "पुढील दोन आठवड्यांपर्यंत कोणतेही ऑफलाइन वर्ग घेतले जाणार नाहीत."

राज्य महामारी तज्ज्ञ म्हणाले की, आरोग्य सेवा संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाने परिसरात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले आहेत. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि प्रोटोकॉलनुसार सर्व पावले उचलत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com