Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Tarun Tejpal Supreme Court Latest: ‘तहलका’चा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याला २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे.
Tarun Tejpal Supreme Court Latest
Tarun Tejpal CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘तहलका’चा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याला २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तेजपालचा आत्मसमर्पणातून सूट मिळण्यासाठीचा अर्ज फेटाळून लावत येत्या ३ आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

तरुण तेजपालतर्फे ज्येष्ठ ॲड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करण्यासाठी व आत्मसमर्पणासाठी ४ आठवड्यांची मुदत दिल्याचे सांगत सवलतीची विनंती केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सिब्बल यांचा दावा फेटाळला आणि मुख्य अपिलावर सुनावणी सुरू होण्यापूर्वी तेजपालने तुरुंगात आत्मसमर्पण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले.

Tarun Tejpal Supreme Court Latest
Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

६ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत तेजपालला दोषी ठरविले होते. उच्च न्यायालयाने त्याला १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० लाख रुपयांपेक्षा जास्त दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाविरोधात तेजपालने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे गोवा सरकारने तेजपालच्या शिक्षेत वाढ करून ती जन्मठेप करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com