थर्टी फर्स्टला रात्री 8 वाजता सनबर्न बंद करा, आमदार मायकल लोबोंनी का केलीय अशी मागणी?

गोव्यात दरवर्षी 29 ते 31 या काळात सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते.
Sunburn Goa 2023
Sunburn Goa 2023
Published on: 
Updated on: 

Sunburn Goa 2023: गोव्यात दरवर्षी 29 ते 31 या काळात सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. वर्षाअखेर असल्याने मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातून येणारे पर्यटक या महोत्सवात हजेरी लावत असतात. सनबर्न वागातोर येथून पेडणे येथे स्थलांतरित केला जाणार असल्याची चर्चा सुरु असताना, आमदार मायकल लोबोंनी 31 डिसेंबर आणि सनबर्न बाबात एक मागणी केली आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात येत असतात. 31 डिसेंबर रोजी गोव्यात प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर लोक गर्दी करत असतात.

दरम्यान, याच काळात होणाऱ्या सनबर्नमुळे त्याकडे आकर्षित होणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी ईडीएम सनबर्न रात्री आठ वाजता बंद करावा अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

"आठ वाजता सनबर्न बंद केल्यास शॅक आणि हॉटेल मालकांना ग्राहक मिळतील. तसेच, हणजूण किंवा वागाोतर परिसरातच सनबर्न व्हावा कारण या भागात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. थोडा त्रास होईल मात्र, स्थानिकांना उत्पन्न मिळेल," असे वक्तव्य आमदार लोबोंनी केले आहे.

दरम्यान, यावर्षीचा सनबर्न वागातोर ऐवजी पेडण्यात होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत आवश्यक परवानगी प्रक्रिया देखील पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पेडणेकर याला विरोध करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Stray Cattle
Porvorim elevated road traffic
Goa Assembly Election
Michael Lobo Bardez Development
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com