Sunburn Anthem 2024
पणजी: सनबर्न आयोजकांना अद्याप महोत्सवासाठी जागा सापडत नसतानाच त्यांनी महोत्सव गीत आज सादर केले आहे. ‘खोये यहाँ’चे एक ऊर्जा देणारा ट्रॅक आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध डीजे आणि निर्माते केश्मर, उदयोन्मुख ईडीएम तारा ओटीऑट आणि गायक केले यांनी सादर केला आहे. २८ ते ३० डिसेंबरदरम्यान सनबर्नचे आयोजन केले जाणार आहे.
केश्मरच्या वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक बीट्ससोबत एथनिक संगीताची जोड देत, हा गाणं एक अविस्मरणीय महोत्सवाचा अनुभव देणारे गीत ठरणार आहे. ‘खोये यहाँ’ गीत अडीच लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे.ईडीएम प्रेमींमध्ये या गीताने खळबळ उडवून दिली आहे, ज्यामुळे सनबर्न गोवासाठी एक उत्तम मंच सज्ज झाला आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे.
ग्लोबल आणि लोकल व्हाईब्सचा जादुई संगम दरवर्षी केश्मरच्या ऊर्जेत अधिकाधिक वाढ आणतो, आणि ‘खोये यहाँ’ या महोत्सव गीतातही त्याची छाप दिसून येते. सदर ट्रॅक ग्लोबल एथनिक घटक आणि धडधडणारे ईडीएम बीट्स यांचा सुंदर संगम आहे.
सनबर्नच्या महोत्सव गीतांची परंपरा आहे. अनेक विस्मरणीय महोत्सव गीते आजवरच तयार झाली आहेत. त्यात २०१५ मधील ‘बझार’ पासून ‘मंडला’, ‘शिवा’, आणि २०२१ मधील ‘अराउंड द वर्ल्ड’ पर्यंत, प्रत्येक ट्रॅकने सनबर्नच्या वारशात विशेष स्थान मिळवले आहे. आता ‘खोये यहाँ’ देखील या यादीत सामील होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.