गोव्यात सनबर्नला परवानगी नाही, तरी ऑनलाईन तिकीटांची नोंदणी सुरू

सनबर्न महोत्सवासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक येतात. या महोत्सवाला येणारे धनाढ्य पर्यटक असतात.
Sunburn Festival is not allowed in Goa, but online ticket registration start
Sunburn Festival is not allowed in Goa, but online ticket registration startDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात सनबर्न महोत्सवाच्या (Sunburn Festival Goa) आयोजकांनी प्रक्रिया सुरू केली असली तरी अद्याप कोणतीच परवानगी दिलेली नाही. यासंदर्भातची फाईल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याकडे पाठवली असून ती त्यांच्याकडेच आहे. माझ्याकडे अजून आलेली नाही. त्यामुळे परवानगी दिली की नाही याबाबत मला माहीत नाही. या महोत्सवाच्या काळात राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात असल्यास सनबर्नला महोत्सवाला परवानगी मिळायला हवी व ‘शो मस्ट गो ऑन’ असे मत पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर (Tourism Minister Babu Azgawkar) यांनी व्यक्त केले.

Sunburn Festival is not allowed in Goa, but online ticket registration start
राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्र

गेल्या कोविड काळात राज्यातील पर्यटन व्यवसाय पूर्ण बंद होता तो गेल्या काही महिन्यात पुन्हा रूळावर येऊ लागला आहे. सनबर्न महोत्सवासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक येतात. या महोत्सवाला येणारे धनाढ्य पर्यटक असतात. पर्यटन क्षेत्राला चांगला व्यवसाय देणारे पर्यटक गोव्याला हवे आहेत. राज्यात बहुतेक कार्यक्रम कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरू आहेत व या महोत्सवालाही कोविडची स्थिती बघून परवानगी देण्याची गरज आहे, असे मंत्री आजगावकर म्हणाले.

सनबर्न महोत्सव आयोजकांनी गोव्यात यावर्षी डिसेंबरच्या 28 ते 30 असे तीन दिवस महोत्सव वागातोर येथे आयोजित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या महोत्सवासाठी नोंदणीही सुरू केली आहे. त्यासाठी लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच हा प्रवेश दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षी हा महोत्सव झाला नव्हता.

Sunburn Festival is not allowed in Goa, but online ticket registration start
.. आता 'IFFI महोत्सव' पडणार महागात!

‘महोत्सव होणे गरजेचे’

सनबर्नला परवानगी मिळाली नसताना त्यांनी या महोत्सवाची तिकीट नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले असता मंत्री आजगावकर म्हणाले, की त्यांना परवानगी अजून दिलेली नाही. मात्र, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com