Sunburn 2023: गोवा सरकारकडून 'सनबर्न'ला परवानगी; मात्र 28 ते 30 डिसेंबर याकाळातच होणार

31 डिसेंबरसाठीचे तिकिटाचे पैसे परत करणार
Sunburn 2023:
Sunburn 2023: Dainik Gomantak

Goa Govts NOC to Sunburn 2023: गोवा सरकारने सोमवारी 28 ते 30 डिसेंबर दरम्यान वागातोर येथे इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत महोत्सव 'सनबर्न' आयोजित करण्यासाठी तात्पुरते ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील आणि राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासह समितीने ही तात्पुरती एनओसी दिली होती.

महोत्सवाच्या आयोजकांनी 31 डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली, असे रोहन खंवटे यांनी सांगितले.

Sunburn 2023:
Panaji Smart City: स्मार्ट सिटी मिशनला मार्च 2024 पर्यंत मिळणार कायमस्वरूपी कार्यालय

मंत्री खंवटे म्हणाले की, आमचे ठाम मत आहे की 31 डिसेंबर हा स्थानिक शॅक मालक आणि इतर भागधारकांना व्यवसाय करण्यासाठी आहे. आम्ही सनबर्नसारख्या गोष्टीला त्यांच्या उत्सवात हस्तक्षेप करू देऊ शकत नाही.

सनबर्नला फक्त संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी आहे. एक तात्पुरती एनओसी मंजूर करण्यात आली आहे.

कारण आयोजकांनी अद्याप नो ड्युज सर्टिफिकेट दिलेले नाही. तसेच कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जमीन मालकांकडून परवानगी देणे बाकी आहे.

Sunburn 2023:
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

31 डिसेंबरचे तिकिटाचे पैसे परत करणार

दरम्यान, सनबर्नचे आयोजक हरिंदर सिंग म्हणाले की, सनबर्न फेस्टिव्हल 28, 29 आणि 30 डिसेंबर रोजीच होईल. तसेच या काळात रात्री 10 वाजेपर्यंत सनबर्न महोत्सव सुरू राहील. 31 डिसेंबरसाठी बुक केलेल्या तिकिटांचे पैसे परत केले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com