मडगाव: कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्यासाठी दवर्ली येथे खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात 6.5 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवून खटला दाखल केला गेलेल्या कोकण रेल्वे महामंडळाचे माजी अध्यक्ष भानू तायल यांच्यासह सहा संशययितांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 23 मे रोजी होणार आहे. या प्रकरणी तायल यांच्यासह निवृत्त सरव्यवस्थापक उदयप्रकाश दास, मुख्य व्यवस्थापक नंदू तेलंग, जिओ रिएलेटर्सचे अमरनाथ गुप्ता, उपसरव्यवस्थापक बबन घाटगे व सुधीर फडके यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.
कोकण रेल्वे कल्याण संघटनेसाठी कर्मचाऱ्यांना घरे बांधण्यासाठी कमी मोलाची जमीन वरील संशयितांनी ज्यादा किमतीत विकत घेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला असून, या प्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.