Summer Camp : पेडणेतील आंबिये कॉलेजमध्ये उन्हाळी शिबीर ; मुलांच्‍या सर्वांगिण विकासात ‘बालभवन’चे मोठे योगदान

Summer Camp : ५०० मुले शिकताहेत विविध कला, अखेरीस होणार सादरीकरण
Summer Camp
Summer Camp Dainik Gomantak

प्रकाश तळवणेकर

Summer Camp :

पेडणे , विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी पडल्यानंतर पेडणे तालुक्यात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी बाल भवन केंद्र व संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयातर्फे अनेक उन्हाळी प्रशिक्षणांची शिबिरे आयोजित केली आहेत.

बाल भवनतर्फे पेडणे तालुक्यात हरमल, कोरगाव, वारखंड, चांदेल, इब्रामपूर अशा पाच केंद्रातून हस्तकला चित्रकला गायन वादन तबला हार्मोनिअम नृत्य अशा प्रकारचे वर्ग सुरू करण्यात आले असून त्यात ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन वर्ग सुरूही झालेले आहेत.

१ एप्रिल ते १५ मेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात मुलांना ज्या गोष्टी शिकविल्या जातात. त्यातील ७ मे व त्यानंतर सादरीकरण गुण दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोरजी येथे बाल भवनाचे केंद्र नसले तरी तेथील पंचायत सभागृहात विद्यार्थ्यांसाठी पंधरा ते एप्रिलपर्यंत शिबिराचे आयोजन केलेले आहे.

Summer Camp
Goa Daily News Wrap: सांगोल्डा कारवाई, लोकसभा निवडणूक, गुन्हे; राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा

असे होते आयोजन

१ पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते नववी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन गेल्या वीस वर्षापासून केले जाते. ते तसे यंदाही करण्यात आले आहे.

२ या उन्हाळी शिबिराचे वेगळेपण म्हणजे या कॉलेजमधील प्राचार्यांसह सर्व शिक्षकवर्ग या शिबिरासाठी वर्गणी काढून खर्च करतात, तर विद्यार्थ्यांकडून नाममात्र फी घेण्यात येते.

३ गेल्या सोळा वर्षापासून सॅम ब्रांगाझा यांच्या नेतृत्वाखाली हे उन्हाळी शिबिर चालते. या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, पाककला, नाच, खेळ, संगीत स्पॉट स्किलींग असे अनेक वर्ग सुरू आहेत, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर चालते.

४ विद्यार्थ्यांना नाश्ता वगैरेची सोय केली जाते. तसेच पाक कला शिकवताना तयार केलेले पदार्थही विद्यार्थ्यांना देण्यात येतात. या उन्हाळी शिबिरात तालुक्यातील १२० विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.

शहरात विद्यार्थ्यांना उन्हाळी शिबिर वगैरेंच्या सर्व सेवासुविधा मिळतात. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा सुविधा मिळत नसल्याने त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्‍न असतो.

- प्रा. सॅम ब्रांगाझा, शारीरिक शिक्षण संचालक, संत सोहिरोबा आंबिये कॉलेज,पेडणे.

उन्हाळी शिबिरात कला छंद जोपासतानाच शिक्षणांबरोबर सृजनशीलकला व सादरीकरण याची प्रेरणा मिळते. जेणेकरून शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी बाल भवन केंद्रात नियमित देऊन शिकले शिकलेल्या कलेचे अध्ययन सुरू ठेवू शकतात.

- शशिकांत पुनाजी, संचालक-बाल भवन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com