Keri News : केरी-फोंडा येथे उन्हाळी शिबिर उत्साहात

Keri News : हे शिबिर अनिशा गावडे यांच्या पुढाकाराने मातृभूमी सेवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित केले होते. शिबिरात एकूण ५५ मुले सहभागी झाली होती.
Keri
KeriDainik Gomantak
Published on
Updated on

Keri News :

सावईवेरे, केरी-फोंडा येथे आयोजित केलेले उन्हाळी शिबिर नुकतेच केरी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात उत्साहात पार पडले.

हे शिबिर अनिशा गावडे यांच्या पुढाकाराने मातृभूमी सेवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित केले होते. शिबिरात एकूण ५५ मुले सहभागी झाली होती.

Keri
Flights To Goa: छत्रपती संभाजीनगर ते गोवा थेट विमानसेवेची घोषणा, जूनपासून आठवड्याला तीन फ्लाईट्स

शिबिरात सरिता नाईक आणि प्रियांका थाणेकर यांनी मुलांना कला, क्राफ्ट, व्यायाम, संगीत, नृत्य यासंबंधी मार्गदर्शन केले. समारोप सोहळा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पंच कांचन केरकर, आयोजक अनिशा गावडे, सरिता नाईक, प्रियांका ठाणेकर यांच्या उपस्थितीत झाला.

मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सहभागी मुलांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. सूत्रनिवेदन प्रसन्ना नाईक यांनी केले, तर अनिशा गावडे यांनी आभार मानले. यानंतर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Trump and Xi Jinping viral banquet video
Bison Attack Death Betoda Goa
Goa Dinesh Gawade Death Case
Goan Farm brand Keri Sattari
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com