फातोर्डा येथील व्यक्तीनं कीटकनाशक प्राशन करून संपवले जीवन

पोलिसांनी केली अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद
Suicide by drinking pesticides at Fatorda
Suicide by drinking pesticides at Fatorda Dainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : कीटकनाशक औषध प्राशन केल्याने एका व्‍यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात करण्‍यात आली आहे. कायतान फर्नांडिस (49) असे त्‍याचे नाव आहे. त्‍याने मंगळवार कीटकनाशक औषध प्राशन केले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आत्महत्या (suicide) नेमकी का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

त्‍यानंतर त्याला अत्यवस्थ वाटू लागल्‍याने दक्षिण गोवा (goa) जिल्हा हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्‍यू झाला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. औषध का प्राशन केले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पुढील तपास सुरू आहे.

Suicide by drinking pesticides at Fatorda
फोंडयातील अपघता टळला मात्र विद्यार्थी घाबरले

दरम्यान, काल केपेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. आपल्या आजोळी जाऊन गळफास घेत या तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी न सापडल्याने आत्महत्या की घातपात असा संशयही व्यक्त केला जाऊ लागला आहे.

कविता असं या तरुणीचं नाव असून ती केपे येथील सरकारी महाविद्यालयात बीकॉमच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत होती. आपल्या आजोळी खानापूर येथे जाऊन तिने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती आहे. कुडचडे पोलिसांच्या माहितीनुसार या तरुणीचं कुटुंब मुळचं खानापूरचं असून कामानिमित्त ते केपे (Quepem) परिसरात राहात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com