Goa Farmer: ऊस आंदोलकांची रात्र पणजीतच

Goa Farmer: धरणे सुरूच : मोर्चा रोखला, आझाद मैदानावर शेतकऱ्यांइतकेच पोलिस
Goa Farmer
Goa FarmerDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Farmer: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना व इथेनॉल प्रकल्‍पासंदर्भात सरकारकडून अद्याप ठोस निर्णय तसेच स्पष्टीकरण मिळाले नसल्याने निराश झालेल्या ऊस उत्पादकांनी आक्रमक होऊन आज येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले.

Goa Farmer
Goa Crime News: मालमत्तेच्या वादातून महिलेचा भोसकून खून

संध्‍याकाळी मोर्चा अडविल्‍यानंतर मिळालेल्‍या आश्‍‍वासनाप्रमाणे सरकारच्‍या वतीने कुणीही भेट देण्‍यास न आल्‍याने आंदोलकांनी रात्री आझाद मैदानावरच राहणे पसंद केले. चार गाड्या भरून दाखल झालेल्‍या आंदोलकांइतकेच पोलिसही आझाद मैदान परिसरात तैनात हाते.

तत्‍पूर्वी सायंकाळी आपल्‍या मागण्‍या घेऊन मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍याकडे जाण्‍याच्‍या पवित्र्यात असलेल्‍या शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी वाटेत अडवला व काही जणांना ताब्‍यात घेतले.

सरकारचे प्रतिनिधी शेतकरी आंदोलकांची भेट घेणार असल्‍याचे आश्‍‍वासन मिळताच शेतकरी पुन्‍हा आझाद मैदानावर परतले. संजीवनी कारखान्याच्या भवितव्याबाबत तसेच या ठिकाणी उद्योग की इथेनॉल प्रकल्प उभा राहील, याचे मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ऊस उत्पादक संघटनेने दिला आहे.

Goa Farmer
Liquor Smuggling In Goa: अवैध मद्याच्या तस्करीप्रकरणात कदंबचे दोन कर्मचारी निलंबित

संजीवनी साखर कारखाना चालवणे सरकारला शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते, तेव्हा संघटनेने एका खासगी संस्थेशी बोलणी केली होती. या संस्थेने हा कारखाना सुरू करण्यास पुढाकार घेतला होता. त्यासाठी ती संस्‍था सरकारला 1.25 कोटी रुपये देण्यासही तयार होती. हा प्रस्ताव सरकारकडे मांडण्यात आला. मात्र, तो पडून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com