सुदिन ढवळीकर
सुदिन ढवळीकरSandip Desai

सुदिन ढवळीकरांनी ‘दरबार’मध्ये घेतली शपथ...

निर्मिती ते शपथविधी: ढवळीकर ठरले नव्या हॉलमध्ये शपथ घेणारे पहिले मंत्री
Published on

अनिल पाटील

पणजी: मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या दृष्टीने आजचा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. दुसऱ्या टप्प्यात का होईना, मंत्रिमंडळ विस्तारावेळी ज्येष्ठतेच्या आधारे त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे अनेक शक्यतांच्या कोलाहलातही नव्या दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणारे ते पहिले मंत्री ठरले आहेत. एका अर्थाने दरबार हॉलच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणारे ढवळीकर यांचा हा बहुमान आणि भाग्यच मानावे लागेल.

सुदिन ढवळीकर
गोव्यात सहलीला जाताय, 'या' ठिकाणांना द्या अवश्य भेट

दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात ढवळीकर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना राजभवन परिसरातील या दरबार हॉलच्या निर्मितीचा प्रस्ताव आला होता. ढवळीकर यांनी तो मंजूर करून यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांची विशेष तरतूदही केली. लगेच तत्कालीन राज्यपाल (स्व.) मृदुला सिन्हा यांच्या उपस्थितीत दरबार हॉलचा पायाभरणी समारंभ पार पडला. मात्र, त्यानंतर ढवळीकर यांचे मंत्रिपद गेले. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात ढवळीकर निवडून आले आणि आता मंत्रिपदाची शपथही घेतली.

सुदिन ढवळीकर
कितीही आमिषे दाखविली तरी 'मगो' सोडणार नाहीच: सुदिन ढवळीकर

शपथविधी सोहळ्यासाठी हॉलची निर्मिती

काबो राजभवन हे पोर्तुगीज काळात उभारले आहे. सध्या ते शपथविधी सोहळ्यासाठी कमी पडते आणि अडचणीचे ठरते म्हणून शपथविधी सोहळ्यासाठी या दरबार हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी सोहळा झाला. मात्र, आज दरबार हॉलमध्ये शपथ घेणारे ढवळीकर हे पहिले मंत्री ठरले. त्यानंतर नीळकंठ हळर्णकर आणि नंतर सुभाष फळदेसाई यांनी शपथ घेतली.

दरबार हॉलची निर्मिती माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात झाली. इथेच मला उपराष्ट्रपतींनी सर्वांत प्रथम सन्मानित केले. त्याच दरबार हॉलमध्ये सर्वांत प्रथम शपथविधी घेण्याचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य समजतो. हा माझ्या मतदारसंघातील लोक आणि राज्यातील हितचिंतकांचा आशीर्वाद आणि सन्मान समजतो.

- सुदिन ढवळीकर, मंत्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com