सुदिन ढवळीकरांचा गोवाच्या मंत्रिमंडळात प्रवेश

स्थानिक नेत्यांचा युक्तिवाद: लोकसभेसाठी मगोपची आवश्यकता नाही
 Sudin Dhavalikar News, Sudin Dhavalikar joins Goa cabinet News
Sudin Dhavalikar News, Sudin Dhavalikar joins Goa cabinet NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय नेतृत्वाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवी दिल्लीला गेलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मगोपच्या नेत्यांना राज्य मंत्रिमंडळात घेतले जाऊ नये, यासाठी पुरेपूर लॉबिंग केले असले तरी यासंबंधातील निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. दक्षिण गोव्याची लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आता मगोपची काहीही आवश्यकता नाही, असा युक्तिवाद स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला आहे. (Sudin Dhavalikar joins Goa cabinet News)

गेले सहा दिवस भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांनी मगोपला मंत्रिमंडळात घेऊ नये, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच त्यांना आता भाजपच्या सुकाणू समितीचाही पाठिंबा प्राप्त झाला आहे.

 Sudin Dhavalikar News, Sudin Dhavalikar joins Goa cabinet News
वास्कोत होलीकोत्सवाला उत्साहात प्रारंभ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीला गेलेले डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि संघटन सचिव सतीश धोंड यांनी मगो पक्षाच्या विरोधात मत दिले आहे. मगोपला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास लोकसभेच्या दोन्ही जागा सहज प्राप्त केल्या जाऊ शकतात, हे केंद्रीय नेत्यांचे मत या तिन्ही सदस्यांनी खोडून काढले आहे.

मात्र, मगोपला मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत आणि आम्ही त्यांना स्थानिक नेत्यांची मते ऐकविण्याचे काम केले, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. सूत्रांच्या मते, गेल्या दोन कारकिर्दीमध्ये भाजपने मगोपला मंत्रिमंडळात स्थान दिले होते. परंतु दोन्ही वेळा मंत्रिमंडळात असल्याचा फायदा घेत ऐन निवडणुकीच्या काळात मगोपने उपदव्याप करून भाजपला अडचणीत आणले, अशी माहिती नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कानावर घातली.

 Sudin Dhavalikar News, Sudin Dhavalikar joins Goa cabinet News
संकल्प आमोणकरांचे घरं वाचवण्याचे प्रयत्न असफल, नागरिक संतप्त

दक्षिणेत एसटी, ओबीसींचा पाठिंबा

जे. पी. नड्डा यांना गोवा भाजपकडून सांगण्यात आले, की दक्षिण गोव्यातही भाजपला पूर्ण राजकीय ताकद प्राप्त झाली आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड तसेच कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वाझ हेही भाजपसोबत आहेत. शिवाय दक्षिणेत एसटी व ओबीसी समाजाचाही भक्कम पाठिंबा भाजपला मिळाला आहे. उत्तरेत पक्षाला विजय मिळविण्यासाठी मगोपची आवश्यकता नाही. दक्षिण गोव्यात वाढलेल्या राजकीय ताकदीमुळे लोकसभेसाठी मगोपची मदत घ्यावी लागते, या समजालाही छेद मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com