
Sudin Dhavalikar Development Work Madakai
फोंडा: मडकई मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पूर्णत्वास येत असून येत्या मार्चपर्यंत संपूर्ण रस्ते हॉटमिक्स करताना लोकांना स्वच्छ सुंदर रस्ते उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगताना बांदोडा कदंब बसस्थानक ते फोंडा रस्ता येत्या एप्रिलमध्ये खुला करण्यात येईल, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बांदोडा येथील प्रभाग क्रमांक दोनमधील हॉटमिक्स डांबरीकरण कामाच्या आज मंगळवारी झालेल्या उद्घाटनावेळी सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, सरपंच रामचंद्र नाईक, पंच सदस्य वामन नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुदिन ढवळीकर म्हणाले, की मडकई मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम पूर्णत्वास येत असून यापुढे खांबांवर वीजतारा दिसणार नाहीत. वीज खांब बदलून लोकांना विजेच्या बाबतीत सुरक्षितता प्रदान करण्यात येत असून नजीकच्या काळात हे काम पूर्ण करण्यात येणार आहेत. पंच सदस्य वामन नाईक यांनी स्वागत केले.
येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो आणि भाजप युती होणार काय असे विचारल्यावर झेडपी निवडणुकीत यापूर्वी कधी युती झाली नाही. त्यामुळे शक्यता कमी असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. महाराष्ट्रातील निवडणुकीसंबंधी भाष्य करताना भारतीय जनता पक्षाने चांगले काम केले असून काँग्रेसकडून नाहक आरोप केले जात असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. ईव्हीएमवर शंका घेणे काँग्रेसने बंद करावे, असे ढवळीकर म्हणाले.
प्रियोळ ते जुने गोवेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील शिल्लक काम हाती घेण्यात येत असून प्रियोळातील कामावेळी फर्मागुढी येथील रस्त्यावरून एकेरी वाहतूक करण्यात येईल. यावेळी वाहतूक फर्मागुढी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील रस्त्यावरून सोडण्यात येईल. तसेच बांदोडा केटीसी बसस्थानक ते फोंडा रस्ता येत्या एप्रिलमध्ये खुला करण्यात येईल. यावेळी चिरपुटे भागातील लोकांना दुचाकीसाठी वेगळी लेन करण्यात येईल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.