Cortalim: मासेमारीसाठी गेला आणि अडकला दलदलीत, शेवटी काय घडलं? कुठ्ठाळी फेरी पॉइंटजवळ धक्कादायक घटना

Cortalim Ferry Point: फेरी पॉइंट, कुठ्ठाळी येथे झुआरी नदीजवळ चिखलाच्या दलदलीत अडकलेल्या एका व्यक्तीला वास्को अग्निशमन केंद्राच्या पथकाने यशस्वीरीत्या बाहेर काढले.
Mud
MudCanva
Published on
Updated on

वास्को: फेरी पॉइंट, कुठ्ठाळी येथे झुआरी नदीजवळ चिखलाच्या दलदलीत अडकलेल्या एका व्यक्तीला वास्को अग्निशमन केंद्राच्या पथकाने यशस्वीरीत्या बाहेर काढले.

प्राप्त माहितीनुसार, एक व्यक्ती शनिवारी सकाळी कुठ्ठाळी फेरी धक्क्याजवळ मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरला असता तो चिखलात रुतला. त्याने अनेकवेळा वर येण्यासाठी प्रयत्न केला; पण त्याला जमले नाही.

Mud
Tanvi Vasta Case: '१० टक्‍के कमिशन'ने सुरूवात, तपासात उलगडला तन्वीचा फसवणुकीचा पॅटर्न, घोटाळ्यांची संख्या 25 वर

जवळच असलेल्या लोकांनी त्याला वर काढण्यासाठी प्रयत्न केला; पण चिखलात घट्ट रुतल्याने त्यांनाही त्याला वर काढणे जमले नाही. त्यावेळी लोकांनी लगेच अग्निशमन दलाला फोन केला असता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्या व्यक्तीला चिखलातून वर काढण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com