Subhas Velingkar Controversy: वेलिंगकरांविरुद्ध लोकांचे उत्स्फूर्त आंदोलन! अनेक तक्रारी दाखल; कडक कारवाईची मागणी

St. Francis Xavier DNA controversy: संत फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरोधात अनुदार उद्गार काढून समस्त ख्रिश्‍चन बांधवांबरोबरच गोमंतकीयांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रारी दाखल. अवशेष प्रदर्शन सोहळा संपेपर्यंत वेलिंगकरांना तडीपार करावे अशी मागणी.
St. Francis Xavier DNA controversy: संत फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरोधात अनुदार उद्गार काढून समस्त ख्रिश्‍चन बांधवांबरोबरच गोमंतकीयांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रारी दाखल. अवशेष प्रदर्शन सोहळा संपेपर्यंत वेलिंगकरांना तडीपार करावे अशी मागणी.
Subhash Velingkar And Relics of St. Francis XavierDainik Gomantak
Published on
Updated on

Subhas Velingkar Statement on St Francis Xavier Relics

म्हापसा: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषाची डीएनए चाचणी करावी, असे आक्षेपार्ह विधान प्रा. सुभाष वेलिंगकरांनी केल्यानंतर सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर वेलिंगकरांच्या या विधानामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत सोमवारी म्हापसा परिसरातील ख्रिस्ती व इतर धर्मातील बांधवांनी म्हापसा पोलिसांना निवेदन दिले.

यावेळी वेलिंगकर यांच्या अटकेचीही मागणी केली. तसेच डिसेंबरमध्ये होणाऱ्या झेवियरांच्या अवशेष प्रदर्शन सोहळा संपेपर्यंत वेलिंगकरांना तडीपार करावे, अशी मागणी यावेळी लावून धरली.

यावेळी जॉन लोबो, राहुल सिक्वेरा, मिलाग्रीस डिसोझा, मेल्विन, जॉन डिसोझा, बेनी, एडविन, फ्रान्सिस फर्नांडिस, मारिया रॉड्रिग्स, संजय बर्डे, सितेश मोरे व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी फ्रान्सिस फर्नांडिस म्हणाले की, सुभाष वेलिंगकारांनी जे शब्द सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी काढले ते स्वीकार्य नाही. मुळात असे वक्तव्य करून वेलिंगकर हे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यांना तत्काळ अटक करावी, तसेच डिसेंबरमधील सेंट फ्रान्सिस झेवियरांच्या अवशेष प्रदर्शनाचा सोहळा होईपर्यंत त्यांना गोव्यातून तडीपार करावे, अशी मागणी त्यांनी केली.

जॉन लोबो म्हणाले की, वेलिंगकरांनी जे दावे केलेत, ते वास्तवात चुकीचे असून गोव्यात जातीय तेढ तथा येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. मुळात असे विधान करून राज्यातील इतर ज्वलंत विषयांपासून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा त्यांचा डाव दिसतो. यात जमिनींचे होणारे अतिक्रमण तसेच भू-माफियांचा विषयाला बगल देण्याचे हे कारस्थान वाटते, असे ते म्हणाले.

पोलिसांनी लगेच कारवाई करायला हवी होती; गोम्स

ज्या दिवशी सुभाष वेलिंगकर यांनी संत सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या संदर्भात जे डीएनए चाचणीचे विधान केले, तेव्हाच पोलिसांनी त्यांच्यावर सूओ मोटो कारवाई करायला हवी होती. गेल्या दोन दिवसांत जे घडले त्याला पोलिसही जबाबदार असल्याचे कॉंग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाला आपण निवेदन दिले असून पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे त्यात नमूद केले आहे. राज्याचे मुख्य सचिव तसेच पोलिस महासंचालक यांना नोटीस पाठवण्याची आपण विनंती केल्याचे गोम्स यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांविरुद्ध लगेच कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी तक्रारीची वाट पाहू नये असे आदेशात स्पष्ट आहे, असे गोम्स यांनी स्पष्ट केले. मात्र वेलिंगकर यांच्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली नाही, असेही गोम्स यांचे म्हणणे आहे. भू रूपांतरण, गोव्याकडे काही प्रमाणात संबंध असलेले दिल्लीत जप्त केलेले अमली पदार्थ यांच्या वरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ही साजीश असल्याचेही गोम्स यांनी सांगितले. या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सांभाळ येथे आणखी साडे तीन ते चार लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर केली जाण्याची शक्यता गोम्स यांनी व्यक्त केली आहे.

कडक कारवाई करा

सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या अवशेषांचा डीएनए चाचणी करण्याची मागणी करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांच्यावर सरकारने कडक कारवाई करवी. तसेच त्यांना अटक करावी, अशी मागणी तियात्र कलाकारांनी केली.

मडगावातीर रवींद्र भवनच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तियात्र निर्माते, दिग्दर्शक, कलाकार उपस्थित होते. शनिवार व रविवारी मडगावात व अन्य ठिकाणी झालेल्या आंदोलनात तियात्र कलाकार सहभागी झाले नाहीत, असे मानणे चुकीचे आहे. वेलिंगकर यांनी जे विधान केले आहे त्याचे तियात्र कलाकारांना सुद्धा वाईट वाटले आहे, वेलिंगकर यांनी केलेल्या विधानावर तियात्र कलाकार सुद्धा चिंतित आहेत. आम्हाला सुद्धा वेदना होत आहेत, असे प्रिंस जेकब यांनी सांगितले. या आंदोलनामुळे ख्रिश्‍चन, मुस्लिम व हिंदू एकत्र आले, असे त्यांनी सांगितले.

तियात्र कलाकारांनी आपल्या मागणीसाठी अनेक आंदोलने केली, पण ती सर्व शांततेने केली. तियात्र कलाकारांनी या घटनेची कातारां तयार केली व यू ट्युबवर पाठवली, त्यामुळे गोव्यात नेमकी काय परिस्थिती आहे हे जगात इतर ठिकाणी असलेल्या गोमंतकीयांना सुद्धा त्याची जाणीव झाल्याचे जेकब यांनी सांगितले.हा केवळ लोकांचे चित्त विचलीत करण्याचा डाव असल्याचे मेनिन द बांदार यांनी सांगितले.

फोंडा पोलिसांतही तक्रार दाखल

संत फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरोधात अनुदार उद्गार काढून समस्त ख्रिश्‍चन बांधवांबरोबरच गोमंतकीयांचा अवमान केल्याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात वेलिंगकरविरोधात तक्रार देण्यात आली. त्यापूर्वी फोंड्यातील माऊंट कपेलसमोर भव्य सभा घेऊन वेलिंगकरांच्या विधानाचा निषेध करून त्वरित कारवाई करण्याची मागणी ख्रिश्‍चनबांधवांनी केली. या सभेत हिंदू तसेच मुस्लिमबांधवही सहभागी झाले होते.

या सभेला उपस्थितांनी वेलिंगकर यांच्याविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून अशा व्यक्तीला त्वरित अटक करण्याची जोरदार मागणी केली. कायदा आणि न्याय हा सर्वांना समान असला पाहिजे, असे सांगताना नवीन कलमांसह फोंड्यातील पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांना तक्रार देण्यात आली. सोमवारी ७ रोजी वेलिंगकर यांच्या जामिनावर न्यायालयात चर्चा होणार असल्याने डिचोली येथे दिलेल्या वेलिंगकरविरोधातील तक्रारीत नवीन कलमांचाही समावेश करावा, असे ख्रिश्‍चनबांधवांनी सांगितले.

पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करू; सावंत

सुभाष वेलिंगकर यांच्‍या विरोधात केलेल्‍या आंदोलनाच्‍या वेळी शनिवारी रात्री आंदोलकांना पांगविण्‍यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. त्‍या लाठीमाराचे छायांकन करण्‍यासाठी गेलेले छाया पत्रकार संतोष मिरजकर यांना पोलिसांनी मारहाण केल्‍याप्रकरणी दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांना भेटून पत्रकारांच्‍या शिष्‍टमंडळाने निवेदन सादर केले. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन सावंत यांनी दिले.

मिरजकर यांनी लाठीमार करणाऱ्या पोलिसांना आपण पत्रकार आहोत असे सांगत आपले ओळखपत्र दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला होता, तरीही तुम्‍ही पत्रकार असाल त्‍याचे आम्‍हाला काय असे म्‍हणत त्‍या पोलिसाने मिरजकर यांच्‍यावरही लाठीमार केला होता. झालेल्‍या प्रकाराबद्दल पोलिसांच्‍यावतीने आपण तुमची माफी मागते. झालेला प्रकार निंदनीय असून तो पोलिस कोण ते आम्‍ही व्हिडिओ छायाचित्रणांद्वारे शोधण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत, असे त्‍यांनी सांगितले.

लोकांनी उत्स्फूर्तपणे केले आंदोलन

राज्यातील विविध सामाजिक आंदोलनात एरवीही चर्च सक्रिय असते, मात्र हिंदू रक्षक समितीचे अध्‍यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्‍यानंतर राज्यातील लोक रस्‍त्‍यावर उतरले, पण त्‍यांना रस्‍त्‍यावर उतरविण्‍यासाठी चर्चची कुठलीही भूमिका नव्‍हती. लोक उत्‍स्‍फूर्तपणे रस्‍त्‍यावर उतरले होते, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्‍यक्‍त केली आहे. सामाजिक भाष्‍यकार ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो आल्‍मेदा यांनी सांगितले की, एरवीही अशा बाबतीत चर्च भूमिका घेते. मात्र यावेळी चर्चने कुठलीही भूमिका घेतली नव्‍हती. लोक उत्‍स्‍फूर्तपणे रस्‍त्‍यावर आले होते आणि याबद्दल काहीजणांनी सामाजिक माध्‍यमांवर आपला रागही व्‍यक्‍त केला.

सामाजिक घटनांवर भाष्‍य करणारे आणखी एक कार्यकर्ते फा. व्‍हिक्‍टर फेर्रांव यांनीही या आंदोलनात लोकांना रस्‍त्‍यावर आणण्‍यास चर्चने कुठलीही भूमिका निभावली नाही. उलट रस्‍त्‍यावर उतरून लोकांना त्रास करू नका असे आवाहन चर्चने शनिवारी रात्री केले. त्‍यामुळेच रविवारी लोक रस्‍त्‍यावर आले नाहीत. रविवारच्‍या मासमधून लोकांना रस्‍त्‍यावर उतरा असे आवाहन कुणीही करू नये असा संदेश सर्व पाद्रींना दिला होता. रविवारी लोक रस्‍त्‍यावर उतरून इतरांना त्‍याचा त्रास व्‍हावा या भूमिकेच्‍या विरोधात चर्च होती.

लोकांनी चर्चकडून आदेश येण्‍याची वाट पाहिली नाही

फा. बोलमॅक्‍स परेरा यांनीही अशीच प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. ते म्‍हणाले, सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याविरोधात वेलिंगकर जे काय बोलले ते ऐकून लोकांचा संयम सुटला. त्‍यामुळे चर्चकडून आदेश येण्‍याची त्‍यांनी वाटच पाहिली नाही. लोक उत्‍स्‍फूर्तपणे रस्‍त्‍यावर आले. ‍यापूर्वी वेलिंगकर यांनी सांकवाळ चर्चच्‍या बाबतीतही असेच वक्‍तव्‍य केले होते. त्‍यावेळी या प्रकरणी चर्चने ठोस भूमिका घ्‍यावी अशी लोकांची मागणी होती. चर्चने आम्‍हाला आवाहन करावे आम्‍ही रस्‍त्‍यावर येण्‍यास तयार आहोत अशी मागणी त्‍यावेळी लोक करत होते. पण त्‍यावेळीही चर्चने सबुरीची भूमिका घेतली. त्‍यामुळे लोक रस्‍त्‍यावर आले नाहीत. पण यावेळी लोकांचा संयम सुटला आणि ते सरळ रस्‍त्‍यावर उतरले.

St. Francis Xavier DNA controversy: संत फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरोधात अनुदार उद्गार काढून समस्त ख्रिश्‍चन बांधवांबरोबरच गोमंतकीयांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रारी दाखल. अवशेष प्रदर्शन सोहळा संपेपर्यंत वेलिंगकरांना तडीपार करावे अशी मागणी.
Subhash Velingkar: 'धर्माचा अवमान नाही'! वेलिंगकरांच्या वकिलाचा युक्तिवाद; वक्तव्यामागे 'षडयंत्र' असल्याचा पालेकरांचा दावा

चर्च आपल्या धर्माला जागली

सेराफीन कोता यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, चर्च आपल्‍या भूमिकेला जागली. ख्रिस्‍ती धर्म हा सर्वांत सहिष्‍णू वृत्तीचा धर्म मानला जातो आणि चुकलेल्‍यांना माफ करणे हे त्‍या धर्माचे धोरण असते. याच धोरणाला लागून चर्चने लोकांना रस्‍त्‍यावर उतरू नये असे आवाहन केले. चर्चची ही भूमिका एकदम योग्‍य होती असे ते म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com