Sanguem IIT : पेच कायम! केंद्राचा नकार मात्र मंत्री सांगे प्रकल्पावर ठाम

''आयआयटी सांगेतच आकाराला येईल''
IIT Protest in Sanguem Goa
IIT Protest in Sanguem GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गेले काही दिवस सांगे मतदारसंघातील आयआयटी प्रकल्पावरुन गोव्यात जोरदार चर्चा सुरु आहे. यातच राज्य सरकारकडून या प्रकल्प उभारणीच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. कारण केंद्रीय शिक्षण खात्याने राज्य सरकारकडून सीमांकीत केलेली जमीन या प्रकल्पासाठी विचारात घेतली नसल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये खुशीचे वातावरण आहे. यावरुन मंत्री फळदेसाई यांनी आयआयटी निश्चितपणे सांगेतच आकारला येईल असे म्हटले आहे.

(Subhash Phal Dessai said IIT will definitely be constructed at Sanguem Constituency )

IIT Protest in Sanguem Goa
INS Mormugao: आत्मनिर्भर भारताचं आणखी एक पाऊल! नौदलात INS मोरमुगाओ दाखल

मिळालेल्या माहितीनुसार प्रस्तावित सांगे आयआयटी प्रकल्पावरुन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आयआयटी प्रकल्प हा सांगेतच होणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण खात्याच्या नकारानंतर फळदेसाई यांच्या या भुमिकेने पेच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

IIT Protest in Sanguem Goa
Goa Dance Bar: कळंगुटमधील पंचायतीने बेकायदा व्यवसायांवर थेट कारवाई करत 3 डान्स बार केले बंद

मंत्री फळदेसाई म्हणाले की, सांगे मतदारसंघात आयआयटी निश्चितपणे बांधली जाईल, मात्र ही योजना बदलू शकते, यासाठी आमच्याकडे सध्या सांगेसाठीच तीन पर्याय उपल्बध आहेत. त्यामुळे केंद्राकडून एका प्रस्तावासाठी नकार आला असला तरी उरलेले दोन पर्याय आपल्याकडे कायम आहेत.

सांगे येथे खाजगी जमिनीवरही वाजवी दरात आयआयटी प्रकल्प उभारता येईल. यावर देखील विचार केला जाईल, मात्र हा प्रकल्प सांगेतच आकार घेणार असल्याची भुमिका मंत्री फळदेसाई यांनी आज घेतली असून या भुमिकेमुळे स्थानिक व केंद्र सरकार यांच्याविरुद्ध राज्य सरकार असे दोन गट आता तयार झाल्याची स्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com