सुकूर पंचायतीच्या प्रभाग १० मधील पोटनिवडणुकीत सुभाष हळर्णकर यांनी २२ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. ११ सदस्यीय सुकूर पंचायतीच्या सत्ताधारी गटातील पंचसदस्यांची संख्या आता ९ झाली आहे.
गेल्या रविवारी प्रभाग १०च्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानात ९३० पैकी ६८१ मतदारांनी मतदान केले. त्यात सुभाष हळर्णकर यांना ३२२ तर प्रतिस्पर्धी उमेदवार संजय रेडकर यांना केवळ ३०० मते मिळाली. हेरंब हळर्णकर यांना ४५ तर काजल वाडकर यांना केवळ ९ मते मिळाली.
५ मते बाद ठरविण्यात आली. म्हापसा (Mapusa) मामलेदार कार्यालयात सोमवारी सकाळी मतमोजणी हाती घेण्यात आल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आला. मामलेदार प्रतापराव गावकर यांनी सुभाष हळर्णकर हे विजयी झाल्याची घोषणा केली.
२०१२ पासून विद्यमान पर्यटनमंत्री व स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्या सहकार्याने पर्वरी मतदारसंघाचा विकास सुरू आहे. मतदारसंघाच्या विकासाची प्रक्रिया मागील १२ ते १३ वर्षे कोणत्याही जातीधर्माच्या राजकारणाविना केली असून ही कामे यापुढेही अशीच सुरू राहतील, असे विजयानंतर सुभाष हळर्णकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.