Goa Biodiversity: गोव्यातील संपन्न अशी जैवविविधता सांभाळण्यासाठी केंद्रीय धोरणाला सुसंगत असे राज्याचे परिपूर्ण धोरण आखण्याचे ठरविले असून त्यासाठी 45 तज्ज्ञांची एक समिती गठित करण्यात आली आहे. या संवर्धनासाठी गोव्यातील जुन्या पारंपरिक पद्धतींचा वापर होत होता, त्यांचा अभ्यास करून नवे धोरण आखण्याचा निर्णय या समितीच्या पहिल्या बैठकीत ठरविण्यात आले.
गोव्यातील खाजन जमिनीचे संरक्षण, वनरायांची राखण आदी विषयांचा त्यात समावेश आहे. हे धोरण ठरविताना स्थानिक नगरपालिका आणि पंचायतीनाही सामावून घेतले जाणार आहे. (Study of traditional methods for conservation of biodiversity in Goa)
हे धोरण तयार करण्यासाठी काही उपसमित्या नेमण्यात आल्या असून आर्किटेक्ट कमलाकर साधले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व शहरी भागात सर्वसमावेशक विकास या विषयावर अभ्यास होणार आहे, हवामान बदल या विषयावर अभ्यास करण्यासाठी बिट्स पिलानीचे अध्यापक प्रो. राजीव चतुर्वेदी, पारंपरिक पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी पर्यावरण चळवळीतील तज्ज्ञ राजेंद्र केरकर, पठार, जंगल भाग आणि खाजन जमिनी येथील जैवविविधतेचा (Biodiversity) सांभाळ करण्यासाठी पराग रांगणेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे. हे सर्व काम गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांच्या देखरेखीखाली चालू राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.