Pernem News : विद्यार्थ्यांनी छत्रपतींचा आदर्श बाळगून मार्गक्रमण करावे : प्रशिदा मळीक

Pernem News : सम्राट क्लब पेडणे टाऊनतर्फे शिवजयंती साजरी
Pernem
Pernem Dainik Gomantak

Pernem News :

पेडणे, बाल्यावस्थेत शिवबांनी आपल्या आई जिजाऊंकडून गोष्टीरूपाने जे आदर्श गुण घेऊन महान कर्तृत्व केले तसेच कर्तृत्व आज मुलांनी करणे जरूरीचे आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या समग्र शिक्षा अभियान पेडणे ब्लाॅकच्या समन्वयक प्रशिला मळीक यांनी पेडणे येथे केले.

सम्राट क्लब पेडणे टाऊनतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती हुतात्मा मनोहर पेडणेकर उच्च प्राथमिक विद्यालय पेडणेच्या ८० विद्यार्थ्यांच्या सहभागाने साजरी केली. याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी खास निमंत्रीत म्हणून हुतात्मा मनोहर पेडणेकर उच्च प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पार्सेकर उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते व्यंकटेश नाईक म्हणाले, की शिवनेरी गडावरील ‘शिवाई’ या देवीमुळे माता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले.

अत्याचारी बादशाहीचा बिमोड करण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी बालवयातच आई जिजाबाईंनी शिवबांना राजनीती शिकविली. शूरवीरांच्या व रामायण, महाभारतातल्या गोष्टी सांगून त्यांच्यावर बालपणापासूनच संस्कार केले. म्हणूनच शिवाजी महाराज घडत गेले.

विखुरलेल्या मावळ्यांना एकत्र करून मर्द मावळ्यांच्या सहकार्याने गनिमी काव्याने शिवशाहीचा विस्तार केला आणि रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मानवता आणि मानवी मुल्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले. सम्राट क्लब पेडणे टाऊनच्या अध्यक्ष प्रिया टांकसाळी यांचेही समयोचित भाषण झाले.

Pernem
Goa Congress: एकाचे कारगिल युद्धात योगदान दुसरे माजी केंद्रीय मंत्री! गोव्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कोण आहेत?

पारंपरीक दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रमुख पाहुण्या प्रशिला मळीक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी व्यासपीठावरील इतर मान्यवरांत मुख्याध्यापिका सुजाता पार्सेकर, बाबू मोपकर उपस्थित होते. सुत्रसंचालन कार्यक्रमाच्या समन्वयक अध्यापिका शांती किनळेकर यांनी केले, तर साईनाथ देसाई यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com