Schools Reopen: उष्णतेमुळे विद्यार्थी, पालक त्रस्त; तरीही मोठा उत्साह, शाळेत भव्‍य स्‍वागत

मडगाव शहरात सकाळच्या सत्रात वाहतुकीचा उडाला बोजवारा
Schools Reopen in Goa
Schools Reopen in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Schools Reopen in Goa: मडगावात सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्‍यात आले. पहिला दिवस असल्यामुळे शाळा सकाळी १० ते ११च्या दरम्यान सुटल्या. त्यामुळे सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत मडगाव शहरात वाहतुकीचा खोळंबा झाला.

आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांची केवळ हजेरी घेण्यात आली व त्यांना अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. शाळा सुटल्यावर प्रत्येक शाळेत वेळापत्रक व इतर कामकाज ठरविण्यासाठी मुख्याध्यापक, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक यांच्यात बैठका झाल्‍या. उद्यापासून शाळा सकाळी ८ ते दुपारी १.३० पर्यंत नियमितपणे सुरू होतील असे वाटते.

Schools Reopen in Goa
Goa Government Schools: धारबांदोड्यातील 7 शाळांची ‘घंटा’ होणार बंद! पटसंख्येचा अभाव

कडक उन्‍हाळ्‍यामुळे विद्यार्थी व पालक त्रस्त झालेले दिसले. पॉप्युलर विद्यालयाच्‍या मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई यांनी सांगितले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत केले. सकाळी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला.

काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी उकाडा असह्य असल्‍याचे बोलून दाखविले. यंदा पॉप्युलर हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीत मिळून सुमारे ५०० विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. महिला व नूतन विद्यालयात पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांची वाहतूक समिती कार्यरत करण्यात आली.

वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी सहकार्य करा

अनेक शाळांबाहेर वाहतूक पोलिस वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना दिसत होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांचे सहकार्य व समजूतदारपणा आवश्यक आहे.

आपली वाहने थेट शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत न नेता दूर ठेवावीत व मुलांना पायी प्रवेश द्वारापर्यंत पोहचविण्याची त्यानी पालकांना विनंती केली. दरम्‍यान, आजपासून उच्च माध्यमिक शाळाही सुरू झाल्या.

मडगावात श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिकचे बारावीचे वर्ग सुरू झाले. अकरावीचे वर्ग पुढील काही दिवसांत सुरू केले जातील, असे प्रा. राजीव देसाई यांनी सांगितले. यंदा अकरावी व बारावीत प्रत्‍येकी २५० विद्यार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com