Rice Farming: मुलांना भात लागवड, मशागत, अन्न व इतर गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
Valpoi Students Farming Dainik Gomantak

Valpoi: विद्यार्थ्यांनी घेतले शेतीकामाचे धडे; शेतात तरवा लावण्याचा उपक्रम

Rice Farming: मुलांना भात लागवड, मशागत, अन्न व इतर गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
Published on

वाळपई, ता. ३० (वार्ताहर) : येथील डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाचा भाग म्हणून हळदणकर यांच्या शेतात भात (तरवा) लावण्याचा आनंद घेतला. येथील तुकाराम हळदणकर कुटुंबीयांनी वडिलोपार्जित शेतीची जपणूक केली आहे.

मुलांना भात लागवड, मशागत, अन्न व इतर गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना मोठ्या आनंदात शेतात उतरून तरवा लावला, मातीत आपले पाय कसे मुरतात याचा आनंद मुलांनी घेतला. काही मुलांनी पावसाचे गाणे गाऊन वातावरण आनंदित केले.

यावेळी मुलांसमवेत शेतकरी तुकाराम हळदणकर, शिक्षिका अश्वेता गावस, शिक्षक रवींद्र शेटकर, प्रकाश गाडगीळ आदींची उपस्थिती होती. तुकाराम हळदणकर तसेच शिक्षकांनी मुलांनी शेतीची माहिती दिली. शिक्षिका अश्वेता गावस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com