Goa: प्लास्टिकपासून बनविले डांबर, विद्यार्थ्यांचा अभिनव प्रयोग !

वेर्णा येथील पाद्री कोसेसाव इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक कल्पक प्रयोग यशस्वी केले आहेत
Asphalt
Asphalt Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanguem: वेर्णा येथील पाद्री कोसेसाव इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक कल्पक प्रयोग यशस्वी केले आहेत. आता टाकाऊ प्लास्टिकपासून डांबर तयार करण्याचा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांनी केला आहे. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे निसर्गाची हानी होत चालली आहे. बेवारस गुरे दगावू लागली आहे. अजूनही म्हणावा तसा प्लास्टिकचा वापर झालेला नाही. प्लास्टिकचा वापर करू नका, असा संदेश देत बसण्या पेक्षा प्लास्टिक निर्मिती होणार नाही, याची काळजी घेणे आज काळाची गरज बनली आहे, असे हे विद्यार्थी सांगतात.

Asphalt
Police Cup Football: ‘साळगावकर’ला पेनल्टींवर नमवून सेझा अकादमी अंतिम फेरीत

प्लास्टिक (Plastic) वर प्रक्रिया करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकपासून डांबर बनविण्याचा पर्याय निवडला. लहान लहान चिप्स तयार करून त्यावर प्रक्रिया केली असता रस्त्यावर डांबरऐवजी प्लास्टिकपासून बनविलेला डांबर (Asphalt) वापरता येतो, हे या प्रयोगातून सिद्ध केले आहे. या प्रकल्पासाठी केवल पडवळकर, आसिफ शेख, युनूस शेख, गौरक फळदेसाई, रोशन जॉर्ज, यश चोपडेकर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com