

पणजी: गोवा पोलिसांच्या हॅकेथॉनमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेला बळकटी कशी देता येईल यावर विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण उपाय सादर केले. या हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या ‘झिरो कोड’ टीमने विकसित केलेले ‘नाईट व्हिजिल’ ॲप रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांचे रिअल-टाईम निरीक्षण करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे, असे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले. हे ॲप लवकरच प्रत्यक्ष वापरात आणले जाणार आहे.
पोलिस मुख्यालयातील परिषद सभागृहात पार पडलेल्या ‘गोवा पोलिस हॅकेथॉन : २०२५’च्या समारोप सोहळ्यात हे ॲप विशेष चर्चेत राहिले.
राज्यासाठी अत्याधुनिक पोलिस साधने विकसित करण्यासाठी आयोजित या ४८ तासांच्या नॉन-स्टॉप तांत्रिक स्पर्धेत गोव्यातील सात महाविद्यालयांतील ३६ पथकांनी सहभाग घेतला.
दरम्यान, ‘झिरो कोड’ व्यतिरिक्त, ‘नगर रक्षक २’ (पोलिस स्थानक भेटींसाठी अॅप) आणि ‘इंटरनल ब्ल्यू’ (११२ हेल्पलाईन डेटा व्यवस्थापनासाठी उपाय) या टीम्सनाही विशेष गौरव प्राप्त झाला. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस महासंचालक आलोक कुमार, पोलिस महानिरीक्षक केशव चौरसिया आणि बिट्स पिलानी गोवा कॅम्पसचे संचालक प्रा. सुमन कुंडू उपस्थित होते.
‘नाईट व्हिजिल’ म्हणजे काय?
‘नाईट व्हिजिल’ ॲप पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीची वेळोवेळी पडताळणी करेल. तसेच गस्तीदरम्यानच्या हालचालींची नोंद ठेवणार आहे. त्यामुळे गस्तीच्या कार्यक्षमतेत मोठी सुधारणा होणार असून जबाबदारी, पारदर्शकता वाढवण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
पोलिस महासंचालक आलोक कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या ॲपमुळे पोलिस विभागाला नवी ऊर्जा आणि सर्जनशीलता लाभली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.