आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात उद्याच्या राष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करणाऱ्या देशातील विद्यार्थी संघटना, त्यांच्याशी संलग्न विद्यार्थी हे संबंधित विद्यार्थ्यांचे विविधांगी प्रश्न मार्गी लावण्यास प्रयत्नरत असतात का? आणि या संघटना विद्यापीठ, महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांशी लढा देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतात का? याबाबत अभाविप संयोजक तसेच एनएसयूआय गोवा अध्यक्षांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
एनएसयूआय गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले, एनएसयूआयद्वारे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अनेकदा आम्हाला न्यायदेखील मिळाला आहे. कोरोना काळात गोवा विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्यात याव्यात यासाठी आम्ही विद्यापीठ तसेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन केले.
आमच्यावर लाढीचार्जदेखील करण्यात आला. कोरोनाचे संकट वाढल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आम्ही आंदोलन केले.
सामाजिक कर्तव्य म्हणून राज्यातील गावागावांत फिरून कोरोना लसीकरणासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना मदत केली. विद्यापीठात विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांबाबत कुलसचिवांसमोर आंदोलन केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयोजक धनश्री मांद्रेकर म्हणाल्या, विद्यापीठाच्या सत्रांत परीक्षा आणि सीए परीक्षा एकाच वेळी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती.
त्यामुळे हा प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षा निबंधकांना निवेदन देऊन सोडविण्यात आला. डॉन बॉस्को महाविद्यालयात जास्त प्रवेश फी अधिक घेण्यात येत होती यावर आवाज उठवून ती कमी करण्यास लावली.
"कारे महाविद्यालयाचे प्राचार्यांनी परीक्षेचा घातलेला घोळ सर्वांच्या नजरेसमोर आणला, तसेच पूर्वी पदवीप्रदान सोहळा झाल्याशिवाय विद्यापीठाची पदवी देता येत नव्हती; परंतु आम्ही आंदोलन करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करून ही पदवी मिळवून दिली, जेणेकरून शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या अनुषंगाने त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला."
- नौशाद चौधरी, एनएसयूआय गोवाचे संयोजक
"गोवा विद्यापीठातील विविध समस्या ज्यात वसतीगृह, परीक्षा फी, तसेच इतर २३ मुद्दे ज्यावर आम्ही विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिवांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला आता याबाबत लेखी उत्तर देण्यात आले आहे. अभाविप सदोदित विद्यार्थांचे विविध प्रश्न सोडविण्यात तत्पर असते आणि भविष्यातही तत्पर राहील."
- धनश्री मांद्रेकर, अभाविपच्या संयोजक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.