Goa Accident : शाळेच्या बसखाली चिरडून अवेडे केपे येथे विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेची बस विद्यार्थ्यांना बस अवेडे किठंबी येथील धोकादायक वळणावर पोहचली असता समोरून दुचाकीने येणाऱ्या जेसवर्ड याला समोरून जोरदार धडक बसली.
Goa Accident | student dies in bus accident at avede quepem
Goa Accident | student dies in bus accident at avede quepemDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Accident : अवेडे कोठंबी येथे बालरथ (स्कूलबस) आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात चांदर येथील जेसवर्ड मार्टिन्स या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता अवेडे येथील इमाक्यूलेट कन्सेपशन शाळेचा बालरथ विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

शाळेची बस विद्यार्थ्यांना बस अवेडे किठंबी येथील धोकादायक वळणावर पोहचली असता समोरून दुचाकीने येणाऱ्या जेसवर्ड याला समोरून जोरदार धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. केपे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Goa Accident | student dies in bus accident at avede quepem
Goa Police Recruitment : गोवा पोलीस भरती 8 दिवसात सुरु करणार

व्यायाम करण्यासाठी शेल्डे येथे जाताना अपघात

जेसवर्ड मार्टिन्स हा युवक सकाळी व्यायाम करण्यासाठी शेल्डे येथे जिमला जात असताना त्याला अपघात घडला. जेसवर्ड याचा वडील विदेशात कामाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या जाण्याने त्यांच्या चांदर येथील गावावर शोकाकळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Luthra Brothers Bail Hearing
Goa Football Association Awards
Murgaon Raja Shed Demolition
Madgaon Hospital Staff Shortage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com