Sanguem News: ओहोळावरची कसरत, वीजेचा खेळखंडोबा, खड्डेमय रस्ते; सांगेवासीयांची व्यथा

Sanguem Municipal Council: अनेक गावांमध्‍ये आजही मूलभूत सुविधा नाहीत
Sanguem Municipal Council: अनेक गावांमध्‍ये आजही मूलभूत सुविधा नाहीत
Sanguem Dangerous BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

निसर्गाच्‍या सान्निध्‍यात वसलेल्‍या सांगे शहरालासुद्धा पावसाळ्‍यात अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागते. वीज गायब होणे आणि खड्डेमय रस्‍ते या दोन समस्‍या तर सांगेवासीयांची पाठ सोडायला तयार नाहीत. अनेक गावांमध्‍ये आजही मूलभूत सुविधा नाहीत.

निसर्गाच्‍या सान्निध्‍यात वसलेल्‍या सांगे शहरालासुद्धा पावसाळ्‍यात अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागते. वीज गायब होणे आणि खड्डेमय रस्‍ते या दोन समस्‍या तर सांगेवासीयांची पाठ सोडायला तयार नाहीत. नुने-नेत्रावळी गावाच्या कुशीत वसलेला व कावरे-पिर्ला पंचायत क्षेत्रातील मानगाळ या तीस-पस्तीस लोकवस्ती असलेला लहानशा गावात आजही कोणत्‍याही शासकीय सुविधा उपलब्ध नाहीत.

मानगाळ गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या ‘कलरकॉन’ कंपनीने स्वखर्चाने पूर्ण केली आहे. आता राहिली ती मुख्य व्यवस्था म्हणजे वाहतूक सोय. नुने येथील मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर मातीचा कच्चा रस्ता. पावसाळ्यात या गावात येण्या-जाण्यासाठी दोन ठिकाणी ओहोळ लागतात.

पावसाचे पाणी वाढल्यास रस्ता बंद. परिणामी शाळा, काम-व्यवसायही ठप्प. त्‍यामुळे गावातील काही तरुणांनी स्वखर्चाने लोखंडी साकव तयार करून येण्या-जाण्याची सोय केली आहे. परंतु पावसाळ्‍यात ओहोळ पार करताना खूपच धोकादायक आहे.

Sanguem Municipal Council: अनेक गावांमध्‍ये आजही मूलभूत सुविधा नाहीत
Sanguem News : नेत्रावळीतील धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी

तीस-पस्तीस लोकांना दीड किलोमीटरचा रस्ता तयार करून देण्यासाठी शासनाला खर्चिक वाटणे साहजिक आहे. तरीही पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. मानगाळ गावातील युवकांच्‍या म्हणण्यानुसार डांबरी रस्ता नसेल तर चालेल, पण साकव बांधून दिल्यास आपत्‍कालीनप्रसंगी चारचाकी वाहन गावात पोहोचू शकेल.

कठीण परिस्थितीत रात्रीच्या वेळी एखाद्या रुग्णाला इस्‍पितळात नेताना तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी ओहोळावर दोन्ही ठिकाणी मोठा पाईप घालून तेथे माती-काँक्रीटचा भराव टाकल्यास पावसाळी पाण्याला पर्याय निर्माण होऊ शकतो. त्यावरून वाहतूक व्‍यवस्‍थित होऊ शकते. शासनाने पाहणी करून या मोठ्या समस्येतून गावाची सुटका केली पाहिजे.

पोट्यापाण्याचा व्यवसाय म्हणून शेती, बागायतीसाठी गाव सोडता येत नाही. नोकऱ्या सहज मिळणे कठीण असल्यामुळे शेती हाच मुख्‍य व्‍यवसाय आहे. बालवाडी, शाळा, बाजारहाटासाठी या लोकांना नेत्रावळी पंचायत भागावर अवलंबून रहावे लागते. या लोकांचे म्हणणे आहे की, आमच्‍या मोठ्या मागण्‍या नाहीत. प्रवास व वाहतुकीसाठी केवळ साकव बांधून द्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com