Mega Project: सावळफोंड ‘मेगा प्रकल्पा’ला स्थानिकांचा जोरदार विरोध

Mega Project: काही पंचही एकवटले: पंचायतीने बेकायदेशीररीत्या परवाना दिल्याचा आरोप
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Mega Project:

कुठ्ठाळी - सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सावळफोंड प्रभाग २ मध्ये परमेश कन्स्ट्रक्शन्स कॉपरेटीव्हच्या ‘मेगा प्रकल्पा’ला पंच सदस्यांबरोबर स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला. या मेगा प्रकल्पात 650 फ्लॅट 70 व्हिला व पाच जलतरण तलाव होणार आहेत.

प्रकल्पाला सांकवाळ पंचायत व मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचा परवाना आहे, परंतु पर्यावरण दाखला, आरोग्य दाखला व इतर परवाने नाहीत.

या प्रकल्पाला 2007 ते 2015 मध्येही स्थानिकांनी विरोध केला होता. अखेर पंचायतीने बेकायदेशीररीत्या या प्रकल्पाला परवानगी दिली. प्रकल्पाला मान्यता दिली त्याच दिवशी पंचायतीच्या खात्यात 65लाख रुपये जमा झाले. प्रकल्पाला मान्यता देण्यात सत्ताधारी पंच सदस्य असल्याचे पंच तुळशिदास नाईक, मारवेल कार्व्हालो, सामाजिक कार्यकर्ते नारायण नाईक, कुठ्ठाळी काँग्रेस गटाध्यक्ष पीटर डिसोझा व इतरांनी सांगितले.

Panjim Smart City
Goa Politics: भाजपकडून आज उमेदवारीवर मोहोर

सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सावळफोंड येथे परमेश कंन्ट्रक्शन कॉपोरेटीव्हतर्फे ३५ हजार चौ. मी. जागेत हा प्रकल्प होणार आहे. सांकवाळ पंचायतीच्या ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पासंदर्भातचा ठराव ५ विरुद्ध ४ मतांनी संमत करण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी मेगा प्रकल्पाला ग्राम सचिव, सरपंच व इतर सत्ताधारी पंचांनी मान्यता दिली.

नंतर पंचायतीच्या बँक खात्यात मेगा प्रकल्पातर्फे 65 लाख रुपये जमा झाले. मेगा प्रकल्पाला पंच व स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्पाला मान्यता देणे पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा पंच तुळशिदास नाईक यांनी केला. सांकवाळ पंचायतीत सत्ताधारी पंच सदस्यांनी भ्रष्टाचार माजविला असल्याचा आरोप पंच नाईक यांनी केला.

याप्रसंगी माजी सरपंच प्रेमानंद नाईक, माजी उपसतंच रोकोझीना वालीस, माजी पंच रॉकी वालीस , सिस्टर व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Panjim Smart City
Goa E-Bus: ई-बसेसचा निर्णय अन्यायकारक

प्रकल्पाला मंत्र्याचा पाठिंबा: नारायण नाईक

सावळफोंड येथील मेगा प्रकल्पाला भ्रष्ट पंच सदस्यांनी गैरमार्गाने मान्यता दिली असून त्यांना येथे प्रकल्प उभारण्यास स्थानिक रहिवासी कदापी मान्यता देणार नसल्याचे नारायण नाईक यांनी सांगितले. सावळफोंड येथील ३५ हजार चौ. मी. जागा पूर्वी जंगल म्हणून घोषित करण्यात आली होती. अचानक ही जागा व्यावसायिक करून घेतली. नंतर प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव पंचायतीमार्फत सुरू करण्यात आला. सांकवाळ पंचायत भ्रष्ट्राचाराने बरबटलेली असून त्यांना एका मंत्र्याचा पाठिंबा लाभत असल्याचा दावा नारायण नाईक यांनी केला.

‘विरोधासाठी प्रसंगी प्राण गेले तरी बेहत्तर’

पंच मारवेला कार्व्हालो यांनी सांगितले की, सांकवाळ सावळफोंड येथे येणाऱ्या मेगा प्रकल्पाला सत्ताधारी पंच सदस्यांनी गैर मार्गाने परवानगी देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. यात ग्राम सचिव, प्रभारी सरपंच व सत्ताधारी पंच सदस्य गुंतलेले आहेत. ११ मार्च रोजी मेगा प्रकल्पाचा ठराव मांडणे व त्याच दिवशी प्रकल्पाला मान्यता देणे हे पंचायत राज्य घटनेत बसत नाही. या प्रकल्पाविरोधात गरज पडल्यास आम्ही प्राण गमवायला मागे पुढे पाहणार नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com