मडगावात होणार वाहनांवर धडक कारवाई

मडगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
Madgaon Parking Issue
Madgaon Parking IssueDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी : मडगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही रस्त्यांवरच वाहने पार्क केली जातात, त्यामुळेच हा प्रश्‍न जटील होत आहे. घाऊक मासळी मार्केट परिसरात तर याची जास्त प्रचिती येते. मडगाव मधील वाहतूक पोलिस सेलने गंभीर दखल घेतली असून या संदर्भात कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे.

रस्त्याच्या बाजूला कायम स्थितीत पार्क करून ठेवलेली वाहने हलविण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही. घाऊक मासळी मार्केट परिसरात आम्ही कारवाई सुरू केली आहे. मासळीवाहू वाहनांना ठराविक वेळ ठरवून दिली आहे. एकदा मासळी उतरवली, की वाहने तिथे ठेवता येणार नाहीत. मडगाव नगरपालिकेनेही रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनासंदर्भात कारवाई करणे आवश्यक आहे, असे वाहतूक पोलिस निरीक्षक गौतम साळुंके यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी रोहित कदम यांनी अशा वाहनांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. अजूनतरी नगरपालिकेने या संदर्भात पुढील पाऊल उचललेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com