Street Dog: भटक्या कुत्र्यांना अन्न वाढणाऱ्या महिलेला दम, उपद्रव वाढल्याने नागरिक संतप्त

locals warn woman feeding dogs: चौदा वर्षीय मुलीवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनेवरून संतप्त स्थानिकांनी एकत्रित येत या भटक्या कुत्र्यांना अंत्रुजनगर कॉलनीत येऊन अन्न वाढणाऱ्या एका महिलेला दम दिला.
Street Dog
Street DogDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: वाढलेला भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, लोकांना चावे घेण्याचे प्रकार तसेच दुचाकींच्या मागे लागण्याच्या घटना फोंडा भागात कायम असताना काल अंत्रुजनगर भागात एका कुत्र्याने चौदा वर्षीय मुलीवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनेवरून संतप्त स्थानिकांनी एकत्रित येत या भटक्या कुत्र्यांना अंत्रुजनगर कॉलनीत येऊन अन्न वाढणाऱ्या एका महिलेला दम दिला.

यावेळी पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व रहिवासी संकुलापासून दूर कुत्र्यांना अन्न वाढण्याची सूचना केली.

एका अल्पवयीन मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे पाहून पीपल्स फॉर ॲनिमल संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाला प्रारंभ केला.

यापूर्वी याच जखमी मुलीच्या भावावरही भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली.

दुसरी घटना

दोन महिन्यांपूर्वी दुर्गाभाट-फोंडा भागात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक मुलगी ठार झाली होती. या दुर्दैवी घटनेची आठवण ताजी असतानाच अंत्रुजनगर भागात एका मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे स्थानिक संतप्त झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com