Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Stray Cattle In Siolim: शिवोली परिसरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी भटकी जनावरे ठाण मांडत असल्याने छोटे-मोठे अपघात होणे नित्याचेच बनले आहे.
Stray Cattle In Siolim
Stray CattleDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: शिवोली परिसरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी भटकी जनावरे ठाण मांडत असल्याने छोटे-मोठे अपघात होणे नित्याचेच बनले आहे. वाहनचालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.

येथील सेंट एन्थॉनी चर्चपासून ते थिएटर जंक्शनपर्यंतचा रस्ता वर्दळीचा असतो. परंतु, आधीच अरुंद आणि दुभाजकाने विभागलेल्या या रस्त्यावर जागोजागी भटकी जनावरे तसेच कुत्र्यांचे कळप फिरत असतात. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन जावे लागते.

Stray Cattle In Siolim
Goa Illegal Construction: जमीन अभिलेखांमध्ये कथित फेरफार; किनारी बेकायदा बांधकामांप्रकरणी कोर्टाची सरकारला नोटीस

स्थानिक पंचायत तसेच आमदार दिलायला लोबो यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन या भटक्या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com