ईदी अमिनच्या सैनिकाच्या रूपाने त्यांच्या समोर काळच उभा होता पण...

युगांडाचे त्यावेळचे क्रूरकर्मा अध्यक्ष ईदी अमीन यांनी भारतीयांचे शिरकांड सुरू केले होते.
 पेद्र लैताव आणि त्यांच्या पत्नी एलिस आपल्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहताना
पेद्र लैताव आणि त्यांच्या पत्नी एलिस आपल्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहतानाDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: 1970 चा तो काळ. युगांडाचे त्यावेळचे क्रूरकर्मा अध्यक्ष ईदी अमीन यांनी भारतीयांचे शिरकांड सुरू केले होते. अशाच परिस्थितीत एकदा आपल्या आजारी भावाची विचारपूस करण्यासाठी तो बाहेर पडला. त्याचवेळी त्याला सैनिकांनी (Soldiers) पकडून जिवंत मारण्यास नेले. तुझी शेवटची इच्छा काय असे त्याला विचारले असता, मला फक्त एक ग्लास पाणी द्या असे त्याने सांगितले. आणि तिथेच त्याचे दैव त्याच्या बाजूने धावत आले. त्याला पाणी देण्यासाठी त्याच्या डोक्यावरील कपडा काढला. आणि त्याच्या चांगल्या नशिबाने त्याच्या पुढे असलेला सैनिक त्याच्या ओळखीचा निघाला. त्याने त्याला सोडून दिले. आणि तो काळाच्या जबड्यातून सही सलामत निसटला... (story of Pedra Lazar Laitav from Varca)

 पेद्र लैताव आणि त्यांच्या पत्नी एलिस आपल्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहताना
खाणलुटीची वसुली ऐच्छिक नव्हे!

ही गोष्ट वार्का येथे राहणारे आणि आज आपल्या वयाची 103 वर्षे पूर्ण करणारे पेद्र लाझार लैताव यांची. ही गोष्ट जणू कालच घडली आहे अशा तरेने ते ती सांगतात. ते फक्त ईदी अमीन यांच्याच तावडीतून सुटले असे नव्हे तर कोविडचा (Covid-19) तीन जीवघेण्या लाटांनाही यशस्वी तोंड दिले. वयाची शंभरी त्यांनी तीन वर्षांपूर्वीच गाठूनही अजून चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागत. 6 मुले, 15 नातवंडे आणि तीन पतवंडे यांचे प्रेम आणि लाघवी हास्य हेच आपल्या दिर्घ आयुष्याचे रहस्य असे असे ते हसत हसत सांगतात.

संपूर्ण वार्का परिसरात लाझारिन भाव म्हणून ओळखले जात असलेल्या पेद्र लाझार हे आज 22 तारखेला आपल्या वयाची 103 वर्षे पूर्ण करत असून त्यांची दिनचर्या ही आश्चर्य वाटण्याजोगी आहे. त्यांनी उभ्या आयुष्यात कधी मोटार चालविली आणि किंवा मोटारसायकलही, मात्र वयाच्या 85 वर्षापर्यंत ते नियमित आपल्या सायकलने गावात फेरफटका मारायचे. तरुणपणी फुटबॉल, टेनिस, बिलियर्ड अशा खेळात रमणारे पेद्रबाब यांना बागकामाचीही आवड होती. वयाची 99 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपला हा छंद जोपासला. म्हातारपण झाल्यामुळे त्यांना मुले घराबाहेर पडू देत नसत तरीही वयाची 95 वर्षे पूर्ण केल्यावरही कधी कधी ते घरच्यांचा डोळा चुकवून बस गाठायचे आणि मडगाव गाठायचे. नंतर भाड्याच्या मोटारसायकल वरून ते घरी येत असत असे त्यांची 88 वर्षीय सहचारिणी एलिस सांगते.

त्यांचे पुत्र पॉल सांगतात, या 103 वर्षांच्या काळात त्यांना फक्त एकदाच इस्पितळाची (Hospital) पायरी चढली आणि ती सुद्धा फक्त एका दिवसासाठी. आजही त्यांना फारशी औषधे घेणे आवडत नाही असे त्यांनी सांगितले.

त्यांची पत्नी एलिस सांगते, 1972 साली आम्ही आमच्याकडे जे काय किडुकमिडुक होते ते घेऊन युगांडातून गोव्यात आलो. सहा मुलांचे पालन पोषण, शिक्षण हे अवघड काम होते. पण देवाच्या दयेने आम्ही तेही दिव्य पार पाडले. आज आमचे भरलेले घर पाहून खूप खूप समाधान वाटते. हे समाधानच आमच्या दीर्घ आयुष्याचे गमक आहे.

त्या दोघांना आणि त्यांच्या भरलेल्या कुटुंबाला पाहिले की हे शब्द तंतोतंत खरे आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com