निवडणुकीत महिलांना 50 टक्के जागा आरक्षित ठेवण्यासाठी सर्व पक्षांना निवेदन

गोवा राज्यातील महिला सशक्त बनविण्यासाठी त्यांना विधानसभेत स्थान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे
Statement will be issued to all parties to reserve 50 per cent seats for women in goa elections
Statement will be issued to all parties to reserve 50 per cent seats for women in goa electionsDainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीत (Goa Election) महिलांना (Womens) आरक्षण देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांना 50 टक्के जागा आरक्षित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व पक्षांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. राज्यातील महिला सशक्त बनविण्यासाठी त्यांना विधानसभेत स्थान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी मागणी समाजसेविका रॉयला फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केली.

Statement will be issued to all parties to reserve 50 per cent seats for women in goa elections
Goa Politics: भाजप सरकारविरुद्ध विरोधकांचा एल्गार

राज्यसभा, लोकसभा निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळण्यासाठी 25 वर्षांपूर्वी राज्यसभा व त्यानंतर लोकसभेत विधेयक सादर केले होते. परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही. पंचायत निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण दिल्यामुळे आपल्याला पूर्वी या आरक्षणामुळे निवडून येण्याची संधी मिळाली. मात्र, आता विधानसभा निवडणुकीतही महिलांना पुरुषांबरोबर समान उमेदवारीचा अधिकार देणे काळाची गरज आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी ॲड. सिओला वाझ, सबिना मार्टिन्स आणि इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या. गोव्यातील महिलांना आरक्षण मिळण्यासाठी आम्ही राज्यातील प्रत्येक पक्षाला निवेदन सादर करणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com