State Level Bhajan Spardha: भजन स्‍पर्धेत ‘महागणपती’, ’आजोबा’ प्रथम; पारितोषिके प्रदान

राज्यस्तरीय भजनी स्पर्धा आयोजित करण्याची मंडळांची मागणी
State Level Bhajan Spardha
State Level Bhajan SpardhaDainik Gomantak
Published on
Updated on

State Level Bhajan Spardha: ‘भांगराळे गोंय’ आयोजित अकराव्या राज्यस्तरीय कोकणी भजन स्पर्धेत महिला गटात श्री महागणपती महिला भजनी मंडळ आमोणा यांना, तर पुरुष गटात आजोबा कल्‍चरल असोसिएशन, केरी-सत्तरी यांना प्रथम पारितोषिके प्राप्त झाली.

वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिराच्या सभागृहात नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उद्योजक कमलाक्ष नाईक, राजेश प्रभू, डॉ. पूर्णानंद च्यारी, श्रीधर कामत बांबोळकर, पंढरी परब, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुहास वेर्णेकर आणि मान्यवर उपस्थित होते. एकूण १३ पथकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

State Level Bhajan Spardha
Serial Killer Mahanand Naik: एका फोन कॉलमुळे उघड झाली महानंदची कुकृत्ये; पोलिसांची चाल यशस्वी

महिला गटातील स्पर्धेत द्वितीय श्री नागेश महारुद्र महिला भजनी मंडळ कुडका-बांबोळी, तर तृतीय पारितोषिक प्रतीक कला महिला भजनी मंडळ, मौळा भाटी यांना मिळाले. पांडुरंग महिला भजनी मंडळाला उत्तेजनार्थ तर नागझर भोम येथील श्रीकृष्‍ण बाल आरती मंडळाला खास पारितोषिके देण्यात आली.

पुरुष गटातील स्पर्धेत द्वितीय श्री लक्ष्मी भजनी मंडळ सावईवेरे, तर तृतीय श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ सत्तरी यांना मिळाले. श्री शांतादुर्गा नृसिंह भजनी मंडळ सांकवाळ व श्री शांतादुर्गा भजनी मंडळ धामसे सत्तरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

राज्यस्तरीय कोकणी भजन स्पर्धा आयोजिण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडला. बक्षीस वितरण सोहळ्याला साहित्यिक कमलाकर म्हाळशी, दशरथ नाईक, नाटककार महेश नाईक, नामदेव सुर्लकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन्ही स्पर्धांचे परीक्षक म्हणून विठ्ठल शिरोडकर, प्रेमानंद केळुस्कर, प्रल्हास गावस, मोहनदास पोळे, गणेश पार्सेकर, दुर्गाकुमार नावती यांनी काम पाहिले. सुहास वेर्णेकर यांनी स्वागत तर पूर्णानंद च्यारी यांनी प्रास्ताविक केले. सूरज कोमरपंत यांनी सूत्रसंचालन तर राजेश प्रभू यांनी आभार मानले.

कलाकारांना वैयक्तिक बक्षिसे

उत्कृष्ट गायनासाठी गौतम गावस (आजोबा केरी), गवळण गायनासाठी विनय गावस (श्री शांतादुर्गा कुडतरी), हार्मोनियम वादन पांडुरंग गावस (सातेरी मंडळ, सत्तरी), पखवाज वादन नीरज गावडे (श्री शांतादुर्गा धामशे), घुमट वादन सुभाष कडेकर (लक्ष्मी, सावईवेरे) तर कासाळे वादन सर्वांग नाईक (शांतादुर्गा सांकवाळ) यांना वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com