Goa Unemployment Rate: मोन्सेरात म्‍हणाले,  गोव्याच्या कामगार विभागाकडून ही आकडेवारी देण्‍यात आलेली नाही. केंद्रीय पातळीवरून जाहीर झालेली बेरोजगारीची आकडेवारी आम्‍ही स्वीकारत नाही
Unemployment Rate|Babush MonserrateCanva

केंद्रीय ब्‍युरोने 'गोव्‍यातील बेरोजगारीची' दिलेली आकडेवारी चुकीची? आक्षेप नोंदवूनही दखल न घेतल्‍याने कामगार खाते तोंडघशी

Goa Unemployment Rate: मोन्सेरात म्‍हणाले, गोव्याच्या कामगार विभागाकडून ही आकडेवारी देण्‍यात आलेली नाही. केंद्रीय पातळीवरून जाहीर झालेली बेरोजगारीची आकडेवारी आम्‍ही स्वीकारत नाही
Published on

पणजी: केंद्रीय कामगार ब्‍युरोने गोव्‍यातील बेरोजगारीची दिलेली आकडेवारी पूर्णपणे चुकीची आहे आणि आम्ही ती स्वीकारत नाही, असे कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज सांगितले; परंतु सदर अहवाल जाहीर होण्‍यापूर्वीच गोव्‍याने आक्षेप नोंदवूनही केंद्राने दखल न घेतल्‍याने कामगार खाते तोंडघशी पडले आहे.

केंद्रीय कामगार ब्‍युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीत गोव्‍यातील बेरोजगारीची (Unemployment) टक्केवारी ८.७ टक्के दाखविली आहे. मोन्सेरात म्‍हणाले, गोव्याच्या कामगार विभागाकडून ही आकडेवारी देण्‍यात आलेली नाही. केंद्रीय पातळीवरून जाहीर झालेली बेरोजगारीची आकडेवारी आम्‍ही स्वीकारत नाही.

१४ सप्टेंबरला आक्षेप, ११ दिवसांनी अहवाल

राज्याचे कामगार आयुक्त डॉ. लेविन्‍सन मार्टिन्स यांनी १४ सप्टेंबर रोजी दिल्लीत केंद्रीय कामगारमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान बेरोजगारीच्या दराबाबत आक्षेप घेतला होता.

एका परिषदेसाठी ते दोघे एकत्र आले होते. प्रत्येक राज्याच्या कामगार आयुक्तांना मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

डॉ. लेविन्‍सन मार्टिन्स यांनी आक्षेप नोंदवल्यानंतरही केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या कामगार ब्युरोकडून गोव्‍याचा बेरोजगारी दर हा ८.७ टक्के आहे आणि तो राष्ट्रीय सरासरी ४.५ टक्के दरापेक्षा जास्त असल्याची आकडेवारी २५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती.

Goa Unemployment Rate: मोन्सेरात म्‍हणाले,  गोव्याच्या कामगार विभागाकडून ही आकडेवारी देण्‍यात आलेली नाही. केंद्रीय पातळीवरून जाहीर झालेली बेरोजगारीची आकडेवारी आम्‍ही स्वीकारत नाही
Goa Congress: ..आता बेरोजगारी, गुन्हेगारी, डोंगर कापणी, भ्रष्टाचार, जुगार यावर बोला! राज्यपालांना प्रदेश काँग्रेसचे उत्तर

माहिती कोठून मिळविली याची कल्‍पना नाही

राज्याचे कामगार आयुक्त डॉ. लेविन्‍सन मार्टिन्स यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, ही माहिती मंत्रालयाने कुठून मिळविली याबाबत मी विचारणा केली. ही माहिती घेण्यापूर्वी किंवा घेताना राज्याच्या कामगार खात्याला विश्‍‍वासात घेतले नाही. हे सर्वेक्षण कोणी, कोठे व कधी केले याची सरकारला माहिती नाही. या प्रकाराबाबत मांडविया यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयातून एका अधिकाऱ्याने पुन्हा माझ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला, मात्र आकडेवारी जाहीर करताना चुकीच्याच माहितीचा वापर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com