Panaji News : केंद्रीय वन मंत्रालयाने मागविली वाघांची माहिती

उच्च न्यायालयाने आदेश दिला तरी व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्याची एक प्रक्रिया आहे.
Tiger Information
Tiger InformationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Panaji News : पणजी, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वन खात्याकडे वाघासंदर्भात असलेली माहिती केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने मागवून घेतली आहे.

यापूर्वी गोव्याच्या जंगलात वाघ आहेत अशी ठाम भूमिका घेणाऱ्या वन खात्याला सरकारच्या नव्या भूमिकेमुळे ही माहिती देताना तारेवरची कसरत करावी लागली.

उच्च न्यायालयाने आदेश दिला तरी व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. ती राज्य सरकारने करावी लागते. त्यासाठीची तयारी वन खात्याने केली होती.

त्यादरम्यान संकलीत केलेली माहिती वन खात्याकडे आहे. तीच माहिती आता केंद्रीय वन मंत्रालयाला कळवण्यात आली आहे.

राज्य सरकारने अधिकृतपणे राज्यातील जंगलात आढळणारे वाघ हे परराज्यातील असावेत अशी भूमिका घेतली असली, तरी वन खात्याने मात्र वाघांचा राज्याच्या पूर्व सीमावर्ती भागात अधिवास असल्याचे मान्य करण्यात आले आहे.

Tiger Information
Goa Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल

राज्यात वाघांच्या झालेल्या हत्या, वाघांनी केलेले हल्ले, कॅमेऱ्यांत बंदिस्त झालेले वाघ या साऱ्याची संकलीत माहिती पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रालयाला सादर करण्यात आली आहे.

याविषयीचे पत्र लिहीताना सरकारी भूमिकेला कोठेही छेद जाता कामा नये याची पूरेपूर काळजी घेण्यात आली आहे.

भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे काय आहे ते कळवून टाका अशी भूमिका या प्रश्नी घेतल्याची माहिती मिळाली आहे. व्याघ्र गणनेवेळी समोर आलेल्या माहितीचे डेहराडून येथील वन्यजीव संस्थेने केलेल्या विश्लेषणाचा आधारही माहिती देताना घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.