काणकोण मिनी बस सेवा त्वरित सुरू करा - जनार्दन भंडारी

विद्यार्थी, नोकरदार आणि गृहीनींची मोठी अडचण; या समस्यांकडे कोण लक्ष देणार का ?
bus News
bus News Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण तालूका हा भौगोलिकदष्ट्या खूप विस्तीर्ण असल्याने येथील लोलये पोळे पैंगीण, खोतीगाव, गांवडोंगरी, आगोंद, खोला इत्यादी अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व अंतर्गत भागातील नागरिक शिक्षण व व्यावसायासाठी खाजगी मिनी गाड्यांनी लांबचा प्रवास करतात. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज काँग्रेसचे सचिव जनार्दन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक खात्याच्या काणकोण मधील अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.

कोविड़ -19 महामारीच्या पहिल्या लाटेत सर्व आर्थिक उपक्रम सक्तीने थांबविण्यात आले आणि रत्यांवर चालणाऱ्या खाजगी मिनी बस गाड्याही बंद झाल्या. कोविडच्या प्रादुर्भावानंतर आता जनजीवन सुरळीत होत आहे, आणि सर्व आर्थिक व्यवहारही सुरू झाले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 सुरू झाले असून, सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाही कोणत्याही निर्बधांशिवाय पूर्ववत चालू झाल्या आहेत.

bus News
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून सरकार योग्य तो निर्णय घेईल; तानावडे

भौगोलिक परिस्थितीमुळे पालक, विद्यार्थी, खाजगी अथवा सरकारी नोकरदार, लहान-मोठे व्यापारी तसेच अंतर्गत भागांतून नेहमीच्या खरेदीसाठी जाणाऱ्या गृहिणींसाठी खाजगी गाडया असल्याने गृहीनी काहीशी स्थिती निभावून नेत आहेत. मात्र खाजगी मिनी गाडयांची सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने व कदंब बसेसची सेवा अपूरी असल्याने आपल्या पाल्यांना वेळेवर शाळेत सोडणे व घरी पोचवणे पालकांना फार कठीण जात असून इतर लोकांनाही फार त्रास सहन करावे लागत आहेत.

काणकोणमधील सर्व शाळांमध्ये बालरथ असूनही ते सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था हाताळू शकत नाहीत. या सर्व बालरथांच्या पेट्रोल अथवा डिझेल व देखभाल खर्चाची बिले मंजूर करण्याची जबाबदारी शिक्षण संचालनालयाची असल्यामुळे संचालनालयाने बालरथांवर मर्यादा घातल्या आहेत. अशा परिस्थितीत पालकांना आपल्या पाल्यांना स्वतःच्या वाहनाने शाळेत पोचवण्याशिवाय दुसरी पर्याय राहिलेला नाही.

bus News
'पंचायत निवडणुकांचा न्यायालयीन खर्च मुख्यमंत्र्यांकडून वसूल करा': मोरेनो रिबेलो

कोविड महामारीनंतर अनेक उद्योग अथवा व्यवसाय बंद पडले आहेत, राज्यातील हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नवीन नोकऱ्या मिळाविण्यासाठी लोकांची धडपड चालू आहे. त्यामुळे मुलांना स्वतःच्या वाहनाने शाळेत पोहवणे खूप अवघड झाले आहे. पेट्रोल- डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी महागाई जास्त वाढली आहे. जीवन जगण्यासाठी मिनी बस मालकाना कसरत करावी लागते. खाजगी बस मालकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या समस्या आमच्यासमोर मांडल्या असे कॉंग्रेसचे सचिव जनार्दन भंडारी यांनी सांगितले.

पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे जुन्या भाडे दरात पुन्हा बस सेवा सुरू करणे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्टया योग्य पर्याय नाही. व्यवसायांत टिकून राहण्यासाठी त्यांच्या भाडे दरांत सुधारणा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. इंधनाची वाढती किंमत लक्षात घेतल्यास त्यांची मागणीही रास्त आहे. खाजगी बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी वाहतूक संचालनालयाने या बसमालकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी सोडविणे अत्यंत आवश्यक आहे.

मुलांशी वारंवार संवाद साधणारे पंतप्रधान आणि शिक्षणाबाबत जास्त काळजी दाखविण्याऱ्या भाजपाने वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलावीत असे आम्हाला वाटते. पालक आणि सामान्या जनतेच्यावतीने आम्ही सरकारकडे जोरदार मागणी जूने बस दर वाढवून किंवा इतर कोणत्याही मार्गाने खाजगी बस मालकांना आर्थिकदृष्टया टिकून राहण्यास आधार करणारी यंत्रणा तयार करावी.अन्यथा सरकारने खाजगी गाडया ताब्यात घेऊन सर्वसामन्यांच्या हितासाठी सर्व खर्च उचलून त्या चालवाव्यात. दोन्ही पर्याय शक्य नसल्यास राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अणि इतर जनसामन्यांची व्यवहार लक्षात घेऊन काणकोण तालुक्यातील अंतर्गत मार्गावर कदंब गाडया तात्काळ सुरू कराव्यात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com