Goa Murder Case: पुतण्यानेच केला घात! कौटुंबिक वादातून काकाचा केला खून

माड्डीतळप- लोलये येथील जानू सोनू खरात(वय 42) याचा कौटुंबिक वादातून पुतण्याने सुऱ्याने भोसकून काकाचा खून केला. ही घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

काणकोण: माड्डीतळप- लोलये येथील जानू सोनू खरात(वय 42) याचा कौटुंबिक वादातून पुतण्याने सुऱ्याने भोसकून खून केला. ही घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवारी रात्री कौटुंबिक वाद झाला होता त्याचे पर्यावसन खूनात झाले.पोलासांनी मृतदेह ताब्यात घेतला असुन, पोलिस निरीक्षक चंद्रहास गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस चौकशी करीत आहेत.

(Stabbed to death due to family dispute in canacona goa)

Goa Murder Case
Vijai Sardesai-Govind Gaude: विजय सरदेसाई यांच्या आरोपात खंडणीचा वास!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी विश्‍वाने डोके वर काढले आहे. विनयभंग, चोरी, गोळीबार, बलात्कार, खून आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट यासारख्या घटनांमुळे सामाजिक अंतरंगात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीमागे राज्याबाहेरील लोकांचा हात

विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत असून गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमधून राज्याबाहेर लोक सहभागी असल्याचे सांगितले आहे.

राज्यात वाढत्या गुन्हेगारीवर मुख्यमंत्र्यांनी जरी असं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही सध्या चांगलच गाजत असलेल्या सोनाली फोगट आणि अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपींमध्ये गोव्यातील लोकच सहभागी असल्यानं मुख्यमंत्री केवळ बचावासाठी सावध प्रतिक्रिया देत असल्याचंही बोललं जात आहे. राज्यात गुन्हेगारी फोफावली आहे.

अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार, कुडचडेत वाळू माफियांमधील अंतर्गत वादातून कामगाराचा खून, चोऱ्या, बायणा वास्को येथे दिवसाढवळ्या चौघांनी तरुणाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणांमुळे सामाजिक क्षेत्रामधून चिंता व्यक्त होत आहे. तर विरोधकांनीही राज्य सरकारवर आगपाखड सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com