ST Reservation: ‘एसटीं’ना अजूनही राजकीय आरक्षण न मिळणे म्हणजे मोठे दुर्भाग्य

गोव्यात ‘एसटीं’ची टक्केवारी आहे, त्यानुसार पाच मतदारसंघ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची गरज
ST Reservation
ST ReservationDainik Gomanak
Published on: 
Updated on: 

ST Reservation: गोव्यात अनुसूचित जमातींना (एसटी) अजूनही राजकीय आरक्षण न मिळणे ही दुर्भाग्यपूर्ण बाब असल्याचे परखड मत अनुसूचित जाती-जमाती कल्याणासाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष कीर्ती प्रेमजीभाई सोळंकी यांनी व्यक्त केले. ही गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटले, असेही ते खेदाने म्हणाले.

या समितीने आज एसटीबहुल राय गावाला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या आरक्षणबद्दल विचारले असता ते म्हणाले, गोव्यात ‘एसटीं’ची टक्केवारी आहे, त्यानुसार पाच मतदारसंघ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने त्यासाठी त्वरित केंद्राकडे मागणी करावी, अशी सूचना आम्ही केली आहे. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखालील 30 खासदारांची समिती अभ्यास दौऱ्यावर असून अनुसूचित जाती-जमातींच्या राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली.

ST Reservation
Watch Video: गोवेकर & पर्यटक दोघांत हाणामारी, पणजीत भर रस्त्यात झाला राडा

हा आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदाच कुणीतरी आमच्या लक्षात आणून दिला आहे. आजपर्यंत हे आरक्षण का मिळाले नाही, हे कळणे कठीण आहे. गोवा सरकारने त्यासाठी जी प्रक्रिया करायला हवी होती, ती योग्य प्रकारे केली नसावी. निदान आता तरी सरकारने त्वरित पाऊले उचलावीत.- कीर्ती सोळंकी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com